केसात कोंडा झालाय? तर हे उपाय करून पाहा!

केसातील कोंडा ८-१० वर्षांच्या मुलांपासून उतारवयातील व्यक्तींना सुद्धा ही समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, आता तुम्ही घरात बसून स्वस्त आणि मस्त उपायांनी कोंड्याची समस्या कायमची सोडवू शकता.

Mumbai
how to remove hair dandruff?
केसात कोंडा झालाय? तर हे उपाय करून पाहा!

केसातील कोंड्याच्या समस्याशी प्रत्येक व्यक्ती लढताना दिसतो. या समस्येला कुठल्याही वयाची मर्यादा नाही आहे. केसातील कोंडा ८-१० वर्षांच्या मुलांपासून उतारवयातील व्यक्तींना सुद्धा होऊ शकतो. केसातील कोंडा म्हणजे? केसांमध्ये काही वेळा पांढऱ्या छोट्या आकाराचे किंवा कधी खपल्यांसारखे निघालेले त्वचेचे थर दिसतात, त्यालाच केसातील कोंडा म्हणू शकतो. केस कोरडे असतील तर केस विंचरताना कोंडा खपल्यांसाराखे निघून जाते. तर केस तेलकट असल्यास डोके खाजवल्यावर तो सुटा होऊन दिसू लागतो. केसातील त्वचेचा थर म्हणजेच कोंडा. हा कोंडा घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र, आता तुम्ही घरात बसून स्वस्त आणि मस्त उपायांनी कोंड्याची समस्या कायमची सोडवू शकता.

केसातील कोंडा दूर करण्याचे उपाय 

१. लसून ही जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. केस धुण्याच्या आधी लसून पेस्ट आणि मध यांचे मिश्रण केसांना लावाल्यामुळे केसातील कोडा कमी होण्यास मदत होते.

२. केस धुण्याच्या अगोदर काही मिनिटे लंबू सर डोक्याला लावून ठेवा आणि थोड्यावेळात ते शांपुने धुवुन टाका. त्यांनी केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

३. खोबरेल तेल हे ही कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी ते शांपूने धुवा. यामुळेही कोंडा कमी होतो.

४. अॅपल व्हिनेगर कोंड्यावर फारच गुणकारी आहे. या व्हिनेगारमधल्या आम्लामुळे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स सांभाळला जातो. यामुळे कोंड्याची वाढ होत नाही. नियमित वापरामुळे कोंडा कायमचा दूर होतो.

५. मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून केसांच्या मुळांशी लावावी. त्यानंतर ती धुवून टाका. त्यामुळे केसातील कोंडा कमी होते.

६. तमालपत्राची ७ ते ८ पाने एक कप पाण्यात उकळून घ्यावीत आणि त्या पाण्याने केस धुवावेत. त्यामुळे नक्कीच कोंडाच्या समस्येपासून बचाव होऊ शकतो.

७. सिताफळाच्या बियांचे चूर्ण हे बाजारात विकत मिळते. त्याची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावून ठेवावी आणि त्यानंतर ते धुवून टाकावी. त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here