घरलाईफस्टाईलकपड्यांवरील डाग घालवण्यासाठी करा हे उपाय

कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी करा हे उपाय

Subscribe

या उपायांनी दूर करा कपड्यांवरील डाग

अनेकदा काम करतांना किंवा प्रवास करताना कपड्यांना डाग लागतात. त्यामुळे कपडे खराब होतात. मात्र हे कपड्यावरील डाग घालवताना अक्षरश: नाकीनऊ येतात. परंतु काही घरगुती उपाय केल्यास डाग सहज निघून जाण्यास मदत होते.

टाल्कम पावडर

साडी किंवा ड्रेसवर तेलाचे डाग पडल्यास त्यावर टाल्कम पावडर चोळावी यामुळे तेलकट डाग दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

मीठ

कधी कधी खिशात ठेवलेल्या पेनाची शाई फुटते आणि त्याचे डाग शर्टला लागतात. मात्र ते डाग काढताना प्रचंड त्रास होतो. परंतु त्या डागांवर मीठ चोळल्यास शाईचे डाग दूर होण्यास मदत होते.

नेल पॉलिश रिमूव्हर

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हर एक रामबाण उपाय आहे. डाग असलेल्या ठिकाणी रिमूव्हर लावल्यास डाग सहज निघून जाण्यास मदत होते.

- Advertisement -

निलगिर तेल

कपड्यांना सायकल ऑईलचे डाग लागल्यास त्यावर निलगिर तेल लावल्याने डाग दूर होतात.

औषधी गोळी

एखाद्या कपड्यांना डाळिंबाचे डाग लागले असल्यास त्यावर कुठल्याही औषधाच्या गोळीची पावडर टाकल्यास फळांचे डाग दूर होण्यास मदत होते.

विनेगार

शेगडीचे किंवा स्टोव्हचे कपड्यांना डाग लागले असता ते दूर करण्यासाठी त्याला थोडेस विनेगार लावल्यास डाग दूर होण्यास मदत होते.

लिंबू

कपड्यांवर एखाद्या खाण्याचे डाग पडले असल्यास त्यावर लिंबू चोळल्यास डाग दूर होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -