तुमच्या फ्रिजमधूनही येते का दुर्गंधी?

Mumbai
how to remove stinky smell from your fridge try these simple tips
तुमच्या फ्रिजमधूनही येते का दुर्गंधी?

बऱ्याचदा आपण फ्रिजमध्ये अन्नपदार्थ खराब होऊ नये, याकरता ठेवतो. मात्र, अनेकदा दोन – तीन दिवस होऊन गेले आणि आपल्या लक्षात नसल्यास ते अन्न पदार्थ खराब होते. त्यामुळे संपूर्ण फ्रिजमध्ये अचानक दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. परंतु, फ्रिज साफ करुन देखील दुर्गंधी जात नाही. अशावेळी नेमके काय करावे?, असा प्रश्न गृहिणींना पडतो. मात्र, जर आता तुमच्या फ्रिजमधून दुर्गंधी आल्यास काळजी करु नका, असे काही आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत ज्यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

लिंबू

फ्रिजमधून दुर्गंधी येत असल्यास एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये एक लिंबू कापून त्यातील अर्धा भाग त्या पाण्यात टाकावा. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

फ्रिजमधून दुर्गंधी येत असल्यास पाण्यात बेकिंग सोडा घालून फ्रिज चांगला स्वच्छ करुन घ्यावा. यामुळे दुर्गंधी येत नाही.

मीठ

फ्रिजमध्ये एखादा पदार्थ पडला असेल आणि त्याची दुर्गंधी जात नसेल तर मीठ एक रामबाण उपाय आहे. एका वाटीमध्ये थोडेस पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घालून एका कापडाने फ्रिज पिसून घ्यावा, यामुळे दुर्गंधी येणे थांबते.

संत्र्याची साल

फ्रिजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी फ्रिजमध्ये संत्र्याची साल ठेवावी. यामुळे दुर्गंधी दूर होते.

व्हिनेगर

व्हिनेगरमुळे फ्रिजमधली दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. याकरता एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळून ती वाटी फ्रिजमध्ये ठेवावी. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.