घरलाईफस्टाईलआग लागल्यानंतर काय करावे उपाय?

आग लागल्यानंतर काय करावे उपाय?

Subscribe

आग लागण्याच्या घटना आजकाल अनेक ठिकाणी घडत आहेत. आग लागल्यानंतर मुळात माणूस घाबरून जातो. पण आग लागल्यानंतर अग्निशामक उपकरणाचा (extinguisher) चा कसा उपयोग करावा अथवा न घाबरता आपल्याला काय सोपे उपाय करता येतील याबद्दल जाणून घेऊया.

अग्निशामक उपकरणाचा उपयोग कसा करावा?

  • आग लागल्यानंतर सर्वात पहिले अग्निशामक उपकरणाचा (extinguisher) वापर करावा.
  • अग्निशामक उपकरणाची पिन अथवा क्लिप काढल्यानंतर अग्निशामक वापरता येते. त्याचं प्रशिक्षण आपल्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाला दिलं जाईल याची काळजी घ्यावी.
  • पिन काढल्यानंतर अग्निशामकाचं तोंड आगेच्या दिशेनं असायला हवं.
  • आग लागलेल्या भागावर त्यामधील इंधन सोडल्यास, धूर तुमच्या तोंडावर अथवा डोळ्यावर येणार नाही. तसंच असं केल्यामुळं आग विझवण्यास मदत होईल.
  • आग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत त्यातील इंधन आगीवर सोडत राहा.

आग लागल्यास करता येणारे सोपे उपाय

  • आग लागल्यास सर्वात प्रथम घाबरून जाऊ नये. आग लागली हे कळल्यानंतर इकडेतिकडे धावाधाव न करता स्वतःचं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा.
  • आग विझवण्यासाठी लागणारं कोणतं साधन तुमच्याजवळ आहे हे बघा.
  • लवकरात लवकर पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करा.
  • दरम्यान आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला अग्निशामन दलाला फोन करायला सांगा. १०१ क्रमांकावर फोन करून योग्य पत्ता आणि माहिती असल्यास, साधारण किती लोक अडकले असण्याची शक्यता आहे याची माहिती द्या.
  • उंच इमारतीत असल्यास, खाली उतरण्यासाठी कधीही लिफ्टचा वापर करू नका. उतरण्यासाठी जिन्याचाच वापर करा.
    एखाद्या खोलीत अडकल्यास, घोंगडी अथवा तत्सम कपड्याचा वापर करून खिडकीच्या दिशेने जाऊन मदतीसाठी धावा करा.
  • कासावीस न होता खिडकीजवळ जाऊन जास्तीत जास्त मदत मागण्याचा प्रयत्न करा.
  • शॉर्टसर्किट झाला असल्यास, पाण्याचा वापर करू नये. सर्वप्रथम घरातील मुख्य स्वीच बंद करावा. त्यानंतर आग लागली असल्यास, कोरड्या मातीचा वापर करता येऊ शकेल.
  • घरातील कोणत्याही बटणांना हात न लावता लाकडी काठीचा अथवा कोणत्याही लाकडी गोष्टीचा उपयोग करावा. सहसा कोणत्याही बटणांना हात लावणं टाळावं. करंट बसण्याची भीती असल्यामुळं अग्निशामन दलाची वाट पाहावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -