घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासापासून बचाव करण्यास करा हे उपाय

उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासापासून बचाव करण्यास करा हे उपाय

Subscribe

मायग्रेनच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी खाण्या-पिण्याचे पथ्य विशेष पाळणे आवश्यक आहे.

सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढल्याने अनेकांना मायग्रेनच्या त्रासाला सामोरो जावे लागते. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे शरिरातील तापमान देखील बदलते. उन्हाळ्यात सूर्याची किरणं शरिरातील तापमान वाढवातातच यासोबतच, अयोग्य आहार, वायूप्रदूषण, डिहायड्रेशन, सोडा, कोल्ड ड्रिंक, कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवनही मायग्रेनचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. मायग्रेनच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी खाण्या-पिण्याचे पथ्य विशेष पाळणे आवश्यक आहे. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठीचे उपाय खालील प्रमाणे

मायग्रेन दूर करण्यासाठी घरगुती उपाय

देशी तूप 

- Advertisement -

मायग्रेनचा महत्त्वाचा उपाय हाच आहे की, आपण रात्री झोपण्यापूर्वी गायीच्या शुद्ध तुपाचे दोन थेंब नाकात टाकावे. यामुळे नाक साफ होतं आणि मायग्रेनपासून सुटका होते.

बर्फानं मसाज

- Advertisement -

मायग्रेनच्या त्रासापासून लगेच आराम मिळविण्यासाठी बर्फाच्या तुकड्यांनी मालिश करावी. तसंच कोमट पाण्यात टॉवेल ओला करून तो मानेवर ठेवावा, आपलं दु:ख कमी होईल

ऑलिव्ह ऑईल 

एका भांड्यात किंवा स्टिमरमध्ये पाणी उकळवून त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळवावं. आता डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ
घ्यावी. १५-२० मिनीटं वाफ घेतल्यानंतर मायग्रेनचा त्रास बंद होईल.

काकडी आणि गाजर 

मायग्रेनचा अती त्रास दूर करण्यासाठी काकडी आणि गाजरचा ज्यूस प्यावा. त्यानं लगेच आराम मिळेल.

ही आहेत मायग्रेनची कारणे 

महिलांना जास्त त्रास

पुरूषांच्या तुलनेत मायग्रेनचा अधिक त्रास महिलांमध्ये दिसून येतो. याचं मुख्य कारण ताणतणावामुळे होणारं हार्मोनल इम्बॅलंसही आहे. तसंच कामाचा रगाड्यात महिला आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे मायग्रेनचा त्रास त्यांना होतो.

 थंड पदार्थ

उन्हाळ्यात प्रत्येकाला आइसक्रीम खावसं वाटतं. आइसक्रीम आणि थंड पेयांच्या सेवनानं सुद्धा मायग्रेनचा त्रास वाढतो. शिवाय व्यायामानंतर लगेच थंड पेय किंवा आइसक्रीमचा आस्वाद घेऊ नये.

चॉकलेट

चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फॅनीलेथाइलामीन नावाचं तत्त्व आढळून येतं. त्यामुळे ब्लड सेल्समध्ये स्ट्रेचिंग वाढतं, जे की मायग्रेनच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतं.

पनीर

जर आपल्यालाही पनीर खाणं आवडत असेल तर हे जाणून घ्या की, उन्हाळ्यात ते खाल्ल्यानं तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तसंच सुखा मेवा, केळ आणि संत्र्यासारखी फळं सुद्धा मायग्रेनचा त्रास वाढवतात. अर्थात ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो त्यांच्यावर हे लागू होतं.

मीठ

अधिक प्रमाणात मीठ, लोणचं आणि मिर्ची खाणं टाळावं. कारण यामुळे पण तुम्हाला असहनिय वेदना होऊ शकतात. शिवाय पिझ्झा सारखे पदार्थही मायग्रेनचा त्रास वाढवतात.

चहा किंवा कॉफी

अनेकदा लोक डोकेदुखी दूर करण्यासाठी चहा किंवा कॉफी पितात. मात्र कॉफीमध्ये कॅफिन असतं जे मेंदूच्या नसांच्या कामात व्यत्यय निर्माण करतात. तसंच त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनही कमी होतं, जे की पुढे जावून मायग्रेनसारख्या त्रासाला निमंत्रण देतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -