Wednesday, April 10, 2024
घरमानिनीHealthघरातील मच्छर घालवण्यासाठी ‘हा’ उपाय ठरेल रामबाण

घरातील मच्छर घालवण्यासाठी ‘हा’ उपाय ठरेल रामबाण

Subscribe

घरात शिरलेले मच्छर सहजासहजी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मलोरिया, डेंग्यू यासारखे अनेक आजार डोकं वर काढतात. मच्छरांना दूर ठेवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. मात्र, तरीही मच्छरांचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे मच्छरांना घरापासून दूर ठेवू शकता.

  • लवंग 

Organic Cloves/ Lavang – GreenDNA® India

- Advertisement -

लवंगाच्या वासाने मच्छर जवळ येत नाहीत. खोबरेल तेल आणि लवंगाचे तेल यांचे मिश्रण करुन ते अंगावर लावावे. यामुळे मच्छर आपल्या जवळ येणार नाहीत.

  • झेंडूचे फुल 

Zendu Images – Browse 966 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stock

- Advertisement -

झेंडूच्या फुलाचा सुगंध हा प्रसन्न करणारा असतो. त्यामुळेच दसरा, गुढीपाडवा अशा सणांवेळी आपण दारावर झेंडूच्या फुलांचा हार लावतो. हा झेंडूच्या फुलांचा हार मच्छरांनाही दूर ठेवतो. कारण झेंडूच्या फुलांचा सुगंध मच्छरांना दूर ठेवतो. यासोबतच झेंडूचे रोप घराजवळ कुंडीत लावल्यास मच्छर दूर राहतात.

  • नैसर्गिक तेल 

Ooty Eucalyptus Oil - BALLAPETTI - Buy Ooty Eucalyptus Oil, Nilgiri Oil

लव्हेंडर, पेपरमिंट आणि निलगिरी यासारखे नैसर्गिक तेल कीटक आणि माशा यांना दूर ठेवतात. यापैकी कोणत्याही तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून हा कापूस खिडकी किंवा दरवाज्याच्या बाजूला ठेवल्यास मच्छर घरात शिरकाव करत नाहीत.

  • कडूलिंब Know Benefits Of Neem Leaves For Skin Hair Immunity And Teeth Marathi News  | Neem Benefits : औषधी कडुलिंबाची पाने, असा करा वापर, रोग होतील दूर

घरात मोठ्या प्रमाणात मच्छर येत असल्यास कडूलिंबाच्या पानाचा धुर करावा. यामुळे मच्छरांसोबत इतर कीटक देखील दूर होण्यास मदत होते.

  • कापूर 

कपूर करता है स्किन और शरीर की कई समस्याओं को दूर, जानें यहां - News Nation

धार्मिक कार्यामध्ये वापरण्यात येणारा कापूर मच्छरवर एक रामबाण उपाय आहे. घरात जास्त प्रमाणात मच्छर येत असल्यास घराच्या चारही बाजूला एक-एक कापराची वडी ठेवल्याने मच्छर कमी होण्यास मदत होते.


हेही वाचा :

थंडीत ‘या’ सवयींपासून दूर रहा

- Advertisment -

Manini