घरलाईफस्टाईलथंडीत पायांची अशी घ्या काळजी

थंडीत पायांची अशी घ्या काळजी

Subscribe

थंडीत बऱ्याच जणांच्या पायांना भेगा पडतात आणि त्यामुळे पाय विचित्र दिसतात. मात्र पायांची चांगल्याप्रकारे काळजी घेतल्यास तुमच्या पायांच्या तक्रारी उद्भवत नाहीत. चला तर जाणून घेऊया कशी घ्यायची पायांची काळजी.

थंडी आली का आपण चेहऱ्याची खूप काळजी घेतो. मात्र आपण ज्यावर उभे राहतो त्या पायांची काळजी घेण्याचं विसरुन जातो. असे पाहिले असता आपले पाय सतत बुटांमधये लपलेले असतात त्यामुळे आपण पायांकडे दुर्लक्ष करतो. परंतु पायांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया थंडीत पायांची काळजी कशी घ्यावी.

  • सतत पाण्यात असल्याने बऱ्याच वेळा स्त्रियांच्या पायांना भेगा पडतात. या भेगांमध्ये घाण साचून राहते. अशावेळी पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच ऑफिसला गेल्यानंतर देखील पाय स्वच्छ धुऊन कामाला सुरुवात करावी.
  • पायांच्या तळव्यांना नेहमी स्क्रब करावे. यामुळे पायाला लागलेली धुळ, माती निघून जाण्यास मदत होते. स्क्रब करण्यासाठी तांदळाचे किंवा जवाच्या पीठाचा वापर करावा.
  • दररोज रात्री झोपताना चोहऱ्यासारखे पायाचेही मॉइश्वरायझर क्रिम लावून झोपावे यामुळे पाय मऊ होतात.
  • पायांना भेगा पडल्या असल्यास पायांना ऑलिव्ह ऑइल लावावे. यामुळे पायांच्या भेगा भरुन निघण्यास मदत होते.
  • पाय मऊ होण्यासाठी तांदळाच्या पीठात थोडेसे मध आणि लिंबाचा रस पिळावा. हे मिश्रण पायाला लावल्याने पाय मऊ होण्यास मदत होते.
  • पायाच्या भेगा भरुन निघण्यासाठी त्यावर ग्लिसरीन लावल्याने भेगा दूर होण्यास मदत होते.
  • ग्लिसरीन आणि गुलाब जल एकत्र करुन ते मिश्रण १० मिनिट पायांना लावावे. यामुळे पाय मऊ होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -