घरलाईफस्टाईलमॉईश्चरायझरचा योग्य वापर करा!!

मॉईश्चरायझरचा योग्य वापर करा!!

Subscribe

आपण सुंदर दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी सकस आहार, व्यायाम, आनंदी जीवनशैली या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुंदर दिसण्यासाठी बाह्योपचारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

आपण सुंदर दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी सकस आहार, व्यायाम, आनंदी जीवनशैली या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुंदर दिसण्यासाठी बाह्योपचारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार गेल्या दहा वर्षांत पौगंडावस्थेतील मुलेही सौंदर्यवर्धनासाठी मोठा खर्च करताना दिसत आहेत. या वयातील मुलांचा प्रसाधनांवर होणारा खर्च ७५ टक्के वाढला आहे. भारतात एक महिला सौंदर्यवर्धनासाठी वर्षभरात सरासरी ९ हजार रुपये खर्च करताना दिसते. तज्ज्ञांच्या मते भारतातील ब्युटी आणि कॉस्मेटिक मार्केट ९५ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. यावरूनच या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येण्यासारखी आहे. अर्थात असं असलं तरी छोट्या मोठ्या उपचारासाठी अथवा सल्ल्यासाठी ब्युटी पार्लर्सची मदत घेण्याची गरज नाही.

सौंदर्यवर्धनासाठी काही टिप्सची मदत होऊ शकते.

दररोज हलका मेकअप करण्याआधी मॉईश्चरायजरचा वापर करावा.

- Advertisement -

मॉईश्चरायजर दोन प्रकारचे असतात. लिक्विड आणि क्रीमबेस.

वातावरणात कोरडेपणा असताना क्रिमी मॉईश्चरायजरचा वापर करावा, तर हवेत गारवा असताना लिक्विड मॉईश्चरायजरचा वापर योग्य ठरतो.

- Advertisement -

तेलकट त्वचेसाठी लिक्विड मॉईश्चरायजर वापरावं.

लिक्विड मॉईश्चरायजरमध्ये एक चमचा ग्लिसरीन, शंभर मिली पाणी मिसळून एअर टाईट बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून वापरावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -