केस धुण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

how to wash your hair properly
केस धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत

केसांचे सौंदर्य हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपले केस लांबसडक, चमकदार आणि घनदाट असावेत, असे वाटत असते. अनेक स्त्रिया आपले केस सुंदर दिसावे याकरता विविध उपाय देखील करत असतात. मात्र, अनेक शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर पॅक लावून देखील केस गळणे, केस पातळ होणे अशा एक ना अनेक तक्रारी असतात. मात्र, केस धुण्यापासून ते केसांना तेल लावण्यापर्यंत विशिष्ट पद्धती आहेत. त्यापैकी केस धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आज आपण पाहणार आहोत.

बऱ्याचदा केस धुतल्याने केसांमधील असणारे नैसर्गिक तेल आणि गुळगुळीतपणा नाहीसा होता. त्यामुळे केस राठ होतात. यासाठी आवश्यक आहे की केस धुण्याच्या किमान एक तासापूर्वी डोक्याची मालीश करावी, असे केल्याने केसांना पोषण मिळेल.

केस धुण्यापूर्वी केस विंचरुन घ्यावे. यामुळे केस धुताना ते तुटण्यापासून वाचतात. केस धुण्यापूर्वी गुंता काढल्याने केस धुणं सोपं जातं आणि केसांची तुटातूट होत नये.

केस धुण्यापूर्वी प्रथम त्यांना कोमट पाण्याने धुवावे आणि चांगल्या प्रकारे ओले करावे. आता काही सेकंदांनंतर शॅम्पूचा वापर करावा जेणे करून केसांमध्ये शॅम्पू व्यवस्थित लागतो.

शॅम्पू क्रीम रूपात लावण्यापेक्षा थोड्या पाण्यात घोळून लावणे नेहमीच योग्य ठरेल. याने कमी प्रमाणात शॅम्पू लागतो आणि केसांच्या मुळापर्यंत पोहचून केसांना स्वच्छ करण्यास मदत होते.

शॅम्पू लावल्यावर बोटांच्या अग्रभागेने मॉलिश करावी आणि पाणी टाकून स्वच्छ करावं. त्याचबरोबर खालील केसांना देखील स्वच्छ करावं. आपले केस अधिक दाट किंवा गुंताळ असल्यास शॅम्पूनंतर कंडिशनर वापरावं.