घरलाईफस्टाईलपांढरे केस काळे करण्यासाठी हे वाचा

पांढरे केस काळे करण्यासाठी हे वाचा

Subscribe

तरुण पिढी पासून मोठ्यांपर्यंत अनेकांना केस पांढरे होण्याची समस्या सतावत असते. या पांढऱ्या केसांपासून त्रस्त असल्यास घरगुती उपायांचा वापर करावा यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.

केस गळणे, पांढरे होणे ही आजकालच्या तरुणाईची गंभीर समस्या बनली आहे. सतत महागडी उत्पादने लावल्याने त्याचा फायदा न होता जास्त नुकसान होते. मात्र असे काही घरगुती उपाय केल्यास पांढऱ्या केसांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय…

आवळा

केस काळे करण्यासाठी आवळा हा एक रामबाण उपाय आहे. केस गळत असल्यास किंवा पांढरे झाल्यास आवळ्याचा वापर करावा. आवळ्याचे बारीक तुकडे करुन खोबरेल तेलात घालून ते तेल गरम करुन केसांना लावल्यास केस काळे होण्यास मदत होते.

- Advertisement -

कोरफड

पांढरे केस काळे करण्यासाठी कोरफड जेल आणि लिंबाचा रस एकत्र करुन केसांना लावावा. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

काळा चहा

केस काळे कराचे असल्यास काळ्या चहाने केस धुवावे. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

- Advertisement -

तूप

तूप ज्या प्रमाणे खाद्यपदार्थात एक विशिष्ट चव आणते. त्याचप्रमाणे केसाकरता देखील तूप एक उत्तम पर्याय आहे. तूपाने केसाला मालिश केल्यास केस काळे होतात.

कडीपत्ता

जर केस पांढरे होत असतील तर कडीपताचा वापर करावा. कडीपत्याची पाने कापून खोबरेल तेलात घालून तेल कोमट करुन केसांना लावावे. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -