घरलाईफस्टाईलपरिक्षेला जाण्याआधी 'या' गोष्टी करा आणि टेंशन फ्री होऊन पेपर सोडवा!

परिक्षेला जाण्याआधी ‘या’ गोष्टी करा आणि टेंशन फ्री होऊन पेपर सोडवा!

Subscribe

येत्या काही दिवसात दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू होईल. परिक्षेला जाताना मुलांना टेंशन आणि मनावर थोडं दडपण हे असतच. अशा मनस्थितीचा परिणाम सहाजिकच परिक्षेवर होतो. परीक्षेला जाताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी जरूर करा..

१. काही दिवस आधीच बॅग भरून ठेवावी. त्यामुळे आयत्यावेळी घाई होणार नाही.

- Advertisement -

2.परीक्षा केंद्रवर जाताना एकापेक्षा जास्त पेन, ब्लाक बॉलपेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी आणि आवश्यक असणारं इतर साहित्य आपलं आपण घेऊन जावं. याशिवाय एकापेक्षा जास्त पेन जवळ ठेवावेत अचानक पेन फुटला किंवा लिहायचा बंद झाला तर दुसरा पर्यायी पेन असावा.

३.सोबत पाण्याची बाटली आवश्यक आहे.

- Advertisement -

४. आपल्या शाळेचं आयडीकार्ड आणि हॉलतिकीट दोन्ही आपल्यासोबत ठेवा. हॉलतिकीटाची एखादी झेरॉक्सही जवळ ठेवा.

५. रायटिंग पॅड घेणार असाल तर शक्यतो ते ट्रान्सपरंट असेल याची काळजी घ्या. अन्यथा ते सभागृहात नेण्यास परवानगी दिली जात नाही.

6. आपल्याला शाळा किंवा कॉलेज लांब आलं असेल तर आपण आपल्यासोबत असलेल्या पेपरच्या वह्या पुस्तकं घेतो. तसं करू नका. शेवटच्या क्षणी वाचून काही होत नाही.

७. परीक्षेला जाताना पोटभर खाऊन पेपरला जाऊ नका नाहीतर झोप येण्याची शक्यता आहे. घरातून गोड खाऊन निघावं. त्यामुळे ऊर्जा राहाते. भुक लागत नाही किंवा भुकेनं बेचैन होत नाही.

८.परीक्षागृहात अर्धातास आधी जावं. आजचा पेपर मला खूप चांगला जाणार आहे आणि मला सगळं आठवणार आहे असं मनोमन चिंतावं आणि हाती पेपर आल्यावर शांतपणे वाचून सोडवायला सुरुवात करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -