घरलाईफस्टाईलब्रेकफास्ट’ला सुट्टी दिली तर....

ब्रेकफास्ट’ला सुट्टी दिली तर….

Subscribe

आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेऊ नका, मात्र, नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते. त्यामुळे नाश्ता किती महत्वाचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तर काही जण ऑफिसला निघण्याच्या घाईमुळे सकाळच्या नाश्त्याला सुट्टी देतात. पण, नाश्ता न घेता दिवसाची सुरुवात करणं योग्य नाही.ताजी फळं, टोस्ट, मोड आलेली कडधान्य, ओट किंवा पोळी-भाजी यांचा समावेश असणारा हेल्दी ब्रेकफास्ट आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. रोज नियमितपणे संतुलित आहार घेण्यासाठी अनेक जण काटेकोरपणे पालन करतात. तर काही जणांना याचं फारसं महत्त्व वाटत नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी चौरस आणि संतुलित आहार जेवढा महत्त्वाचा तेवढंच रोजच्या रोज सकाळी ब्रेकफास्ट करणंही आवश्यक आहे.

- Advertisement -

फायबरयुक्त नाश्ता

फायबरयुक्त नाश्ता सकाळी घेतल्याने त्याचा नेहमी फायदा होतो. धान्यावर करण्यात होणार्‍या प्रक्रियेच्या दरम्यान त्यातील शरीरासाठी आवश्यक फायबर (तंतूमय पदार्थ) निघून जातं. म्हणूनच नेहमी अख्ख्या ग्रेन प्रोडक्ट्सचा आहारात समावेश व्हावा, असं सांगितलं जातं. यासाठी मोड आलेली कडधान्ये, ब्राऊन राईस, होल ग्रेन ब्रेड यामधून अधिकाधिक प्रमाणात फायबर मिळवता येईल.

फायबरमधील तंतूमय पदार्थांमुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. वजन नियंत्रणात राहते. हे फायबर फळे, भाजी, ज्वारी, बाजरी, बीज, गाजर यातून मिळते. याचा वापर नेहमी नाश्तामध्ये करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

ज्यूसऐवजी ताजी फळं खावीत. फळांच्या सालीत, बियांमध्ये आणि गरात फायबर अधिक प्रमाणात असतं. मोड आलेली कडधान्यं अधिक प्रमाणात खावीत.

नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स, रागी, ज्वारी, बार्ली, ब्राऊन राइस, ओटमील या पदार्थांचा समावेश करावा. फळापेक्षा ७५ टक्के अधिक फायबर त्याच्या सालीतून मिळतं. पण, सालासकट फळं किंवा भाज्या खाताना त्या स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका.

पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांमध्येही फरसबी, गाजर, बीट यांसारख्या भाज्या टाकता येतील. नाश्त्यासाठी चपाती-भाजी हाही चांगला पर्याय आहे. पदार्थ खूप शिजवू नका. खूप शिजवल्याने त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. चावता येतील आणि पचायला जड जाणार नाहीत इतपतच शिजवा किंवा वाफवा.

नट्स, सीड्स, मोड आलेली कडधान्य अधिक प्रमाणात खावीत. टोमॅटोसारखी फळं बियांसकट खायला हवीत. कारण या फळांमधील बिया काढून टाकल्याने त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं.

भरपूर पाणी प्यायले पाहिजे

दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवं. कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. फायबरयुक्त पदार्थांचं योग्य पचन होऊन त्यांचं कार्य नीट व्हावं, यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -