घरलाईफस्टाईलपिंपल्समुळं त्रस्त असल्यास, करा 'हे' उपाय

पिंपल्समुळं त्रस्त असल्यास, करा ‘हे’ उपाय

Subscribe

लिंबूचा रस कमीत कमी वेळामध्ये पिंपल्स सुकवतो. लिंबूचा रस कापासामध्ये भिजवा आणि झोपायाच्या आधी मुरुमावर लावा यामुळे चांगला फरक पडेल. परंतु चेहऱ्यावर नेहमी ताज्या लिंबाच्या रसाचाच उपयोग करा.

साधारणतः असं म्हटलं जातं की, पिंपल्स येण्याचं एक वय असतं. पण हल्ली वाढत्या प्रदूषणामुळं पिंपल्सची समस्याही वाढत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक जण काहीना काही वेगळे उपाय सुचवत असतं. तर काही जण त्यासाठी किमती मलमांचाही वापर करताना दिसतात. पण या सगळ्यामुळं पिंपल्स जातातच असं नाही. मुळात वाढतं प्रदूषण, खाण्यातील बदल आणि सतत बाहेरच्या तेलकट खाण्यामुळं चेहऱ्यांवर पिंपल्स अर्थात मुरुमं येत असतात. पिंपल्सवर सर्वात महत्त्वाचा इलाज म्हणजे लिंबू. या लिंबासह काय मिक्स करून पिंपल्स जाण्यासाठी नक्की उपाय कसे करायचे हे खास तुमच्यासाठी.

१. लिंबाचा रस – पिंपल्सपासून मुक्तता मिळवण्यासाठी लिंबू हे सर्वात गुणकारी औषध आहे. लिंबाच्या रसामुळं पिंपल्स जाऊन त्वचेसंदर्भातील अनेक अडचणी दूर होतात. तर त्वचा तजेलदारदेखील होते. एका वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यात कापसाचा छोटा बोळा बुडवावा. पिंपल असलेल्या जागेवर लिंबाचा रस दहा मिनिटं लावून ठेवावा. त्यानंतर पाण्यानं धुवून अतिशय हलक्या हातानं पुसून घ्यायला हवा. दिवसातून हे दोन वेळा केल्यास, पिंपल्स हमखास निघून जातात.
२. लिंबू आणि बेसन – एका वाटीत दोन छोटे चमचे बेसन घेऊन त्यात लिंबांचा रस पिळावा. त्याचा लेप बनवून पिंपल आलेल्या ठिकाणी लावावा. त्यानंतर दहा मिनिटांनी कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून हलक्या हातानं चेहरा पुसावा. जर त्वचा त्यानंतर कोरडी झाली तर मॉश्चरायझरचा उपयोग करावा.
३. लिंबू रस आणि मध – लिंबाचा रस आणि मध एका वाटीत मिक्स करून घ्यावा. पाच मिनिटं हे मिश्रण पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावावं. हा उपाय दिवसातून एकदा केला तरीही पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.
४. लिंबू आणि दही – एका वाटीमध्ये दही आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्यावा. ही तयार झालेली पेस्ट पिंपल्सवर लावावी. काही मिनिटं चेहऱ्यावर ही पेस्ट सुकू द्यावी. तुमच्या अंगातील उष्णता दही शोषून घेतं. त्यामुळं त्वचा कोरडी झाल्यावर चेहरा कोमट पाण्यानं धुवून टाकावा. हा उपाय नियमित केल्यास, पिंपल्सपासून मुक्तता होते.
५. लिंबू आणि अंड्याचा पांढरा भाग – अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करून घ्यावा. पांढऱ्या भागामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालून चांगलं फेटून घ्यावं. त्यानंतर हे मिश्रण तीन भागात करून घ्यावं. पहिला भाग पाच ते सात मिनिटासाठी त्वचेवर लावून ठेवावा. सुकत आल्यावर दुसरा भाग त्यावरच लावावा. पुन्हा तो भाग सुकत आला की, तिसरा भाग त्यावर लावावा. तिन्ही थर सुकल्यावर चेहरा गरम पाण्यानं धुवावा आणि मग हलक्या हातानं पुसून घ्यावा. असं वरचेवर केल्यास, पिंपल्स येणं कमी होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -