Sarva Pitru Amavasya 2020 : जाणून घ्या सर्वपित्री अमावस्येचे महत्व

सध्या पितृपक्षाचा महिना सुरू आहे. अशावेळी आपल्या पित्रांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असून या दिवसाला विषेश महत्त्व आहे. श्राद्धाच्या महिन्यात निधन झालेले आपले नातलग पृथ्वीवर येतात आणि आपल्या मुलांना आशिर्वाद देतात, असा समज आहे. अश्विन मासच्या अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणतात. यालाच महालया अमावस्याही म्हटले जाते.

या दिवशी पित्रांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. ज्यांचे निधन झाले असून त्यांची माहित नसल्यास या दिवशी त्यांचे श्राद्ध घातले जाते. याच दिवशी आपल्या सर्व पित्रांना तृप्त करून त्यांना पुन्हा स्वर्गात पाठवले जाते. श्राद्धाच्या पंधरवड्यात जे आपल्या पित्रांचे श्राद्ध विधी करू शकत नाहीत, ते सर्वपित्री अमावस्येला एकत्रित श्राद्ध घालू शकतात. आजच्या दिवशी पित्रांची विदाई होते. त्यामुळे याला पितृ विसर्जिनी अमावस्याही म्हटले जाते. या दिवशी मुलगा, नातू किंवा अविवाहित मुलगी यांच्या हस्ते पित्रांना पिंडदान केले जाते. यमलोकातून आलेले पितृ आपल्या वंशजांकडून पिंडदानाची अपेक्षा करतात. जर ज्यांचे श्राद्ध घातले नाही. तर ते दुःखी आणि अतृप्त होऊन परतात, असा समज आहे.

हेही वाचा –

Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात ‘हे’ शुभ संकेत