Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात ‘हे’ शुभ संकेत

जाणून घ्या श्राद्धात कावळे कसे देतात शुभ संकेत

In Shraddha, crows give auspicious signs
Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात 'हे' शुभ संकेत

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवणाचा घास देऊन त्यांना प्रसन्न करणे. ज्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्यांना एका विशिष्ट दिवशी जेवण दिले जाते त्याला श्राद्ध म्हणतात. विशेष म्हणजे या काळात कावळ्यांना अधिक महत्त्व दिले जाते. श्राद्धाच्या दिवशी कावळे हे आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे श्राद्धा पक्षात १५ दिवस त्यांना भोजन देखील दिले जाते.

श्राद्ध पक्षामध्ये आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. शास्त्रानुसार, कावळ्यांचे असे अनेक शुभ संकेत आहेत जे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधतात. त्याप्रमाणे आज आपण श्राद्धात कावळे कशाप्रकारे शुभ संकेत ते पाहणार आहोत.

श्राद्ध पक्षातील कावळ्यांचे शुभ संकेत

  • श्राद्ध पक्षाच्या काळात कावळा धान्याच्या ढीगावर बसलेला दिसला तर याचा अर्थ असा की आपल्यावर पात्रांचा आशीर्वाद आहे. यातून आपल्याला लवकरच धन लाभ मिळू होऊ शकतो, असा संकेत दिला जातो.
  • जर कावळा घराच्या छतावर किंवा हिरव्या झाडावर बसलेला दिसला तर याचा अर्थ असा की आपल्याला अचानक पैसे मिळू शकतात.
  • श्राद्ध काळात कावळा गायीच्या पाठीवर चोच मारताना दिसला तर तो पित्रांचा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की पूर्वजांच्या आशीर्वादाने चांगले भोजन प्राप्ती होईल.
  • जर आपणास पितृपक्ष दरम्यान, डुक्करच्या पाठीवर बसलेला कावळा दिसला तर तो एक अफाट धन प्राप्तीच्या दिशेने संकेत दर्शवितो.
  • कावळ्याच्या चोचीत जर तुम्हाला एखादे फूल-पान दिसले तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • श्राद्धाच्या दिवशी कावळा धूळीत माकलेला दिसला तर त्या ठिकाणी पाऊस पडेल असा त्याचा अर्थ होतो.
  • जर कावळा समोरून आला असेल आणि भोजन ग्रहण केले आणि पायांनी डोके खाजवले असेल तर याचा अर्थ असा की आपली कार्ये लवकरच यशस्वी होणार आहेत.
  • जर कावळा उजवीकडून डावीकडे उडला आणि भोजन ग्रहण केले तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या प्रवासात यश मिळेल.
  • जर सकाळी कावळा आला आणि पायाला स्पर्श केला तर याचा अर्थ असा की आपली प्रगती होईल आणि आपल्याला लवकरच पैसे मिळतील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तींनी अजिबात खाऊ नये लसूण