घरलाईफस्टाईलपावसाळ्यात 'अशी' घ्या कारची काळजी

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या कारची काळजी

Subscribe

पावसाळ्यात जशी आपण आपली काळजी घेतो तशीच आपल्याकडे असलेल्या वस्तूची काळजी घेणे देखील तितकचं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज आपण पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्यायची या विषयी जाणून घेणार आहोत.

पावसाळा सुरु होण्याआधीच कारची सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. पावसाळ्यापूर्वी आपण वायपरचा वापर हा जास्त प्रमाणात करत नाही. यामुळे वायपर जाम झाल्याची शक्यता असते. वायपर हा पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे वायपरला ऑइलिंग करुन घ्यावी. तसेच आवश्यक असल्यास वायपरचा रबर पार्ट देखील बदलून घ्यावा. जर कार जुनी असेल तर पाणी डिस्ट्रिब्युटरमध्ये जाऊन कार बंद पडू शकते. म्हणून कारवर प्लास्टिक कव्हर घालावा. पावसाळ्यात कार देखील घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कारचे टायर व्यवस्थित आहेत का हे पाहणं आवश्यक आहे.

- Advertisement -

जिथे पाणी साचतं तिथून जर कार नेली तर कारचे ब्रेकलायनर भिजल्यामुळे ब्रेक कमी लागतात. त्यामुळे जेव्हा कार पाणी साचलेल्या भागातून बाहेर येते तेव्हा कार चालू स्थितीत असताना थोड्या प्रमाणातचं ब्रेक लावून ती चालवावी. तसेच लायटिंग सिस्टीम देखील बिघडू शकतेय. त्यामुळे त्याची पण व्यवस्थित पाहणी करावी. कारची जर लायटिंग सिस्टीम बरोबर नसेल तर अपघात होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात कारच्या पत्र्याला गंज लागण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कारच्या पत्र्याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे कारची काळजी घेतलात तर तुम्ही पावसाळ्यात लाँग ड्राइव्हला जाऊ शकालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -