घरलाईफस्टाईलजगातील ४९ टक्के मधुमेही भारतात

जगातील ४९ टक्के मधुमेही भारतात

Subscribe

जगातील एकूण मधुमेहींपैकी ४९% मधुमेही भारतात आहेत. २०१७ मध्ये एकूण ७२ दशलक्ष मधुमेहींची नोंद झालेली. २०२५ सालापर्यंत हा आकडा दुपटीने वाढून तब्बल १३४ दशलक्षांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मधुमेह हे भारतासमोर एक मोठे आव्हान आहे. २० ते ७० वयोगटातील ८.७% लोकसंख्या मधुमेही आहे. मधुमेह आणि इतर नॉन-कम्युनिकेबल (संसर्गामुळे न होणारे) आजारांसाठी वाढते शहरीकरण, बैठी जीवनशैली, असंतुलित आहार, तंबाखूचा वापर आणि वाढते आयुर्मान विविध घटक कारणीभूत आहेत. जगातील एकूण मधुमेहींपैकी ४९% मधुमेही भारतात आहेत. २०१७ मध्ये एकूण ७२ दशलक्ष मधुमेहींची नोंद झालेली. २०२५ सालापर्यंत हा आकडा दुपटीने वाढून तब्बल १३४ दशलक्षांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या दोन संशोधन संस्था आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया या अॅडव्होकसी संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोव्हेंबर २०१७च्या अहवालासनुसार गेल्या २५ वर्षांत भारतात मधुमेह ६४ टक्क्यांनी वाढला आहे.

अनेक रुग्णालयांची आवश्यकता

भारतातील मधुमेहींची वाढती आकडेवारी पाहता देशात या आजारावर उपचार करणाऱ्या अनेक रुग्णालाची आवश्यकता आहे, जेणेकरून मधुमेह व मधुमेहाशी संबंधित आजारांपासून लोकांचा जीव वाचवता येईल. जेसीआय व एनएबीएच मान्यताप्राप्त असलेल्या मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलतर्फे दक्षिण आशियातील अग्रणी डिजिटल थेरप्युटिक कंपनी असलेली वेल्दी थेरप्युटिक्स यांच्या सहयोगाने ‘डायबेटिस क्लिनिक’ सुरू केले. मधुमेहावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारीत स्युट उपयुक्त ठरणार आहे. या उद्घाटनानंतर येथे उपस्थित असलेल्या रुग्णांसाठी चर्चासत्र आणि निःशुल्क एचबीए१सी चाचणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

“मधुमेहाशी संबंधित विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेले डायबेटिस क्लिनिक प्रयत्नशील असेल. आमच्या ज्या रुग्णांना दीर्घकालीन मधुमेहाने ग्रासले आहे त्यांना वेल्दी थेरप्युटिक्सतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सातत्यतपूर्ण व रिअल-टाईम आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे”-वोक्हार्ड्ट हॉस्पिटल, प्रमुख डॉ. पराग रिंदानी 

“जीवनशैलीमधील बदल हा मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सकस आहार घेणारे, नियमित व्यायाम करणारे रुग्ण मधुमेहाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे उद्भवणाऱ्या इतर गुंतागुंती टाळण्यास अधिक समर्थ असतात.” – डॉ. बेहराम पारडीवाला 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -