घरलाईफस्टाईलभारतीयांची हाडं ठिसूळ होताहेत

भारतीयांची हाडं ठिसूळ होताहेत

Subscribe

भारतीयांची हाडं ठिसूळ होत असून यासंबंधीचा अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरातील एका संस्थेने दिला आहे. हाडांच्या आजाराला गांभिर्याने घेण्याची वेळ आली असल्याचे या अहवालातून आता स्पष्ट होत आहे. भारतीयांनी हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तील दररोज ८०० ते १०० मिलीग्रॅम कॅल्शिअमची आवश्यकता असते. मात्र भारतीयाना सरासरी ४२९ मिलीग्रॅम कॅल्शिअमच उपलब्ध होत असल्याचा खुलाचा एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केला आहे. स्वित्झर्लंड येथील हाडांच्या आरोग्यासंबंधी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑस्टियोपोरोसिस फाऊंडेशन International Osteoporosis Foundation(आयओएफ) या खासगी संस्थेने दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात भारतीयांना आहारातून आवश्यक कॅल्शिअम मिळत नसल्याचे नमूद केले आहे. कॅल्शिअम हे हाडांच्या कणखरतेसाठी महत्त्वाचा घटक आहे. कॅल्शिअम हे ३० ते ३५ टक्के शारिरीक ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) तसेच हाडं ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते.

Skeleton-calciumsml
हाडांना बळकट करण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक

वयाच्या ३० वर्षापर्यंतच हाडांची निर्मिती

हार्ट केअर फाऊंडेशन (एचसीएफआय) चे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्या मते, लोकांच्या कॅल्शिअम ग्रहण करण्याच्या प्रमाणात वयोमानानुसार तफावत असते. हाडांना बळकटी येण्यासाठी तरुण वयातील मुलांना त्या दृष्टीने योग्य आहार ठेवणे फायदेशीर ठकते. तसेच वृद्धावस्थेतही कॅल्शिअमची कमतरता जाणवू लागल्यामुळे हाडांच्या संबंधीत त्रास उद्भवू लागतात. वृद्धांमध्ये वर्षांमागे हाडं ठिसूळ होण्याचे प्रमाण जवळपास १ टक्का होत जाते, त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शिअम दरवर्षी १५ ग्रॅमने कमी होतं. कालांतराने त्यांची हाडं ठिसूळ होतात. यामुळे वृद्ध व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाडांचे वजन ३ किलोने कमी होते. मानवी शरीरात वयाच्या ३० वर्षापर्यंत हाडांची निर्मिती होते. त्यानंतर हाडांच्या पुनर्वसनाची प्रक्रीया सुरू राहते.

- Advertisement -

फळ, भाज्या, दूध आहारात असू द्या

आपल्या शरीराचा ताठरपणा हा हाडांवर अवलंबून असतो. त्यामुळे हाडं मजबूत ठेवणे गरजेचे असते. हाडं मजबूत नसल्यास वृध्दावस्थेत खूप त्रास होतो. परंतु हाडे मजबूत करण्याचे काम मात्र पौगंडावस्थेत किंवा तारुण्यातच करावे लागते. त्यासाठी फळांचा आहार फार महत्त्वाचा असतो. हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शिअमची नितांत गरज असते आणि कॅल्शिअम फळांतून मिळतं. कॅल्शिअमचा पुरवठा फळांइतकाच किंवा फळांपेक्षा जास्त हा दुग्धजन्य पदार्थांतून होत असतो. अशा पदार्थातून हाडांशिवाय दातही मजबूत होतात. कॅल्शिअमसाठी हिरव्या भाज्या अधिक उपयुक्त ठरतात. हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शिअम बरोबरच जीवनसत्त्व क हेही उपलब्ध असते.

food for calcium
कॅल्शिअम वाढवण्यासाठी आहार (प्रातिनिधिक चित्र)

कॅल्शिअमसाठी हे खावं 

दूध, दही, पनीर, काळे चणे, उडीद डाळ, तिळ, पानातील चुन्यात, संत्र्याचा रस

हाडं बळकटं करण्यासाठी हे करा 

  • दररोज ३० मिनीटं चाला
  • धुम्रपान करू नका
  • मद्यपान करू नका
  • कॅफिनचे सेवन कमी करा (कॅफिन हा एक अॅसिडचा पदार्थ आहे जो एनर्जी ड्रिंकमध्ये असतो)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -