घरलाईफस्टाईलखिमा पाव, फिरनी स्पेशल

खिमा पाव, फिरनी स्पेशल

Subscribe

उत्तम क्वालिटीचे मोगलाई फूट, किफायतशीर दरात खायचे असेल तर गुलशन-ए-इराण हा मुंबईतील एक चांगला चॉईस आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला मोगलाई फुडची व्हरायटी मिळते.

गुलशन-ए-इराण

तुम्ही कधी क्रॉफर्ड मार्केटहून मनिष मार्केटच्या दिशेने गेला आहात का? त्या जंक्शनवर एक शानदार गुलशन-ए-इराण हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी असते. मुख्य म्हणजे तुम्ही सकाळी जा, दुपारी जा किंवा रात्री हे एक मजली हॉटेल नेहमीच भरलेले असते. या गर्दीचे कारण म्हणजे येथे मिळणारे फूड. उत्तम क्वालिटीचे मोगलाई फूट, किफायतशीर दरात खायचे असेल तर गुलशन-ए-इराणला हा मुंबईतील एक चांगला चॉईस आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला मोगलाई फुडची व्हरायटी मिळते. फक्त आपण नाव सांगायचे आणि डिश आपल्यासमोर हजर. या हॉटेलचा खिमा पाव, चिकन टिक्का मसाला, गार्लिक नान विशेष प्रसिद्ध आहेत. त्यातही खिमा पावमध्ये अनेक व्हरायटी येथे मिळतात.

खिमा आणि गार्लिक नान हे कॉम्बिनेशनही अप्रतिम आहे. त्याच बरोबर स्टार्टर म्हणून चिकन टिक्का मसाला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याच प्रमाणे मटण अफगाण, मटण मोगलाई अशा डिशेसही अप्रतिम आहेत. मेन कोर्स झाल्यानंतर डेझर्टचे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा ज्या हॉटेलमध्ये आपण जेवतो तेथे डेझर्ट चांगले मिळतेच असे नाही. त्यामुळे डेझर्ट खाण्यासाठी अन्य हॉटेलमध्ये जावे लागते. पण गुलशन-ए-इराणमध्ये ती वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण येथील फिरनी आणि रबडी कुल्फी हे दोन पदार्थ तुमचा डेसर्टचा शौक पूर्ण करू शकतात. येथील फिरनी खरेच लाजवाब आहे. तसेच रबडी कुल्फीची चवही जीभेवर दिर्घकाळ रेंगाळत राहते. मुंबईत शक्यतो ज्या हॉटेलमध्ये चांगले पदार्थ मिळतात त्या हॉटेलमधील चार्जेसही खूप असतात.

- Advertisement -

पण गुलशन-ए-इराण त्याला अपवाद आहे. येथे चिकन, मटण मसाला, अफगाणी, मोगलाई अशा कुठल्याही डिशेस मागवल्या तरी त्याची क्वांटिटी ही दोन माणसे खाऊ शकतील इतकी असते. त्यामुळे एक स्टार्टर, मेन कोर्स आणि दोन डेसर्ट अशा दोन माणसांचा चांगला पोटोबा झाला तरी हॉटेलचे बिल ५०० रुपयांपेक्षा जास्त होत नाही. त्यामुळे हे हॉटेल खवय्यांसाठी पर्वणीच म्हणावे लागेल. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी मरिन लाईन्सला उतरून कॉफर्ड मार्केटला गेलात की त्याच दिशेने समोर येणार्‍या चौकात हे हॉटेल आहे.

-आबा माळकर

- Advertisement -

receipe of sangade veg
सांगाड्याची भाजी

सांडग्यांची भाजी

पदार्थ
1 वाटी सांडगे
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1 बटाटा बारीक कापलेला
2 चमचे कांदा लसणाचं तिखट
1/2 चमचा हळद
फोडणीसाठी पदार्थ
२ चमचे तेल
राइ, जिरे, हींग, कडीपत्ता
चवीपुरते मीठ

सांडग्यांची भाजी बनवण्याची कृती

एका कढाईत सांडगे सुखेच भाजून घ्यावे, मग बाजूला करून ठेवावे. त्याच कढईत तेल गरम करुन त्यात फोडणीचे साहित्य घालावे. फोडणी चांगली तडतडली की, त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत तो परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून 2-3 मिनिटे तो परतावा. पुढे त्यात कांदा-लसनाचे तिखट घालून एकजीव करून घ्यावे.
तयार झालेल्या मिश्रणात भाजून ठेवलेले सांडगे आणि बटाटे घालून परतवून घ्यावे. मग त्यात 2 वाटी घालून ते वाफेवर १० मिनिटे शिजू द्यावे. सांडगे शिजत आले की ,मीठ घालावे. (मीठ सांडग्यांत पण असते म्हणून बेताचेच घालावे.)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -