सकाळचा नाश्ता : ‘तिखट आप्पे’

'तिखट आप्पे' रेसिपी

Mumbai
instant appe recipe in marathi
सकाळचा नाश्ता : 'तिखट आप्पे'

आज आपण नाश्ताला गरमा गरम तिखट आप्पे कसे कयाचे ते पाहणार आहोत.

साहित्य

  • तांदूळ एक वाटी
  • उडीदडाळ अर्धी वाटी
  • चणा डाळ पाव वाटी
  • चार ते पाच मिरच्या
  • १ वाटी कांदा बारीक चिरलेला
  • सहा लसणाच्या पाकळ्या
  • चवीनुसार मीठ
  • मुठभर पोहे
  • आले अर्धा इंच
  • तेल

कृती

सर्वप्रथम दोन्ही डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजत टाकावेत. दहा तासांनी ते भिजवलेले तांदूळ आणि डाळी मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात. बारीक करताना मिरची, आले, लसूण आणि पोहे टाकून वाटाव्यात. वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, मीठ टाकावे. पीठ जास्त पातळ करू नये. आप्पे पात्र गॅसवर तापवत ठेवावे. त्याच्या प्रत्येक गोलात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडावे आणि तयार केलेले मिश्रण चमच्याने थोडे थोडे त्यामध्ये टाकावे. गॅस मंद करून झाकण ठेवावे. दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून चमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत.