घरलाईफस्टाईलInternational Yoga Day: मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी करा 'हे' आसनं

International Yoga Day: मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी करा ‘हे’ आसनं

Subscribe

महिलांमध्ये तणाव आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे

महिलांमध्ये तणाव आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. दर महिन्याला महिलांना येणाऱ्या ‘मासिक पाळी’ मुळे अनेकांना त्रास होतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना यामध्ये हात-पाय दुखणे, ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे अशा समस्या अगदी हैराण करून सोडतात. बऱ्याच महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा सुरूवातीच्या दिवसात पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. कोणतेही काम करतांना या होणाऱ्या वेदनेमुळे थकवा जाणवतो. परंतु, या दिवसांत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी योगसाधना नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

- Advertisement -

जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये योगसाधना केल्याचे फायदे माहित नसतील. या दिवसात होणाऱ्या पाळीच्या वेदना तसेच अस्वस्था दूर करण्यासाठी योगासनातील मर्जरी आसन तसेच वक्रासन फायद्य़ाचे ठरेल. यामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

असे करा मर्जरासन

सर्वात प्रथम गुडघ्यावर जमिनीवर ताठ बसून आपले दोन्ही हात पुढे करून उभे राहा. तुमचे हात आणि गुडघे एका सरळ रेषेमध्ये असतील अशा स्थितीत रहा. तुमच्या गुडघ्यात थोडे अंतर ठेवून सुरुवातीची मुद्रेत तयार रहा. यानंतर श्वास घूऊन आपला चेहरा बाहेरच्या बाजूस घेऊन या. त्यानंतर श्वास सोडून तुमची हनुवटी छातीच्या दिशेला घेऊन जा. अशी क्रिया किमान १० वेळा तरी करा.

- Advertisement -

मर्जरासन करण्याचा फायदा

मासिक पाळीसंबंधातील सर्व समस्या आणि ल्यूकोरियाने ग्रस्त असलेल्या महिलांकरिता हे आसन केल्यास नक्कीच आराम मिळतो. त्याचबरोबर हे या दिवसांत होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

असे करा वक्रासन

वक्रासन करताना सर्व प्रथम पाय पसरून जमिनीवर बसा. आपला उजवा पाय गुडघ्यात दुमडून पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. त्यानंतर श्वास घेऊन डावा हात स्ट्रेच करा. श्वास सोडताना आपल्या डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन जा. त्यानंतर आपला उजवा हात मागे कंबरेवरती घेऊन जा. त्याचबरोबर आपल्या मानेलाही उजव्या बाजूला फिरवा. या स्थितीमध्ये काही वेळ राहून श्वास घेत रहा. असेच दूसऱ्या बाजूला ही करा.

वक्रासन करण्याचा फायदा

वक्रासन आसन मासिक पाळीच्या दरम्यान केल्यास पाठदुखीचा त्रास, कंबर दुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -