मन करा रे प्रसन्न संगीताद्वारे

संगीत ऐकताना आपण मंत्रमूग्ध होतो. संगीत आपल्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतं. आपल्या सुख दुःखात संगीत आपली मित्राप्रमाणे साथ करतं.

Mumbai
listning to music

आपल्या संस्कृतीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीताकडे केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून न पाहता पूर्वीपासूनच संगीताद्वारे जनजागृतीचे कार्यक्रमही राबिवण्यात येत आहेत. संगीत ऐकताना आपण मंत्रमूग्ध होतो. संगीत आपल्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतं. आपल्या सुख दुःखात संगीत आपली मित्राप्रमाणे साथ करतं. रेडिओ, आकाशवाणीच्या काळात आपण संगीताच्या कार्यक्रमांच्या दिवसांची वाट बघत असू. आता मात्र ती वाटसुद्धा पहावी लागत नाही. विकसित तंत्रज्ञानाने आपल्याला संगीत ऐकण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध झाले आहेत. युट्यूब, एम पी ३ ते आयपॉड सारख्या साधनांच्या मदतीने आपण संगीताचा आस्वाद घेतो.

आपल्या ग्रामीण भागात आजही घरातील महिला वर्ग पहाटेच्या पारीला तूप लोणी काढताना किंवा जात्यावर दळताना गुणगुणतात. सकाळची सुरुवातच कष्टदायी वाटू नये यावर त्यांनी शोधलेला हा उपाय. त्यांच्या गुणगुणण्याने घरातील इतर मंडळींची सुरुवातही संगीतमय होते. अशाच जात्यांवरील ओव्यांमधून आपल्याला संत कवयित्री बहिणाबाई चौधरी लाभल्या. संतकवी सावतामाळी सुद्धा शेताची कामे करताना गुणगुणत असत. त्यांचे अनेक अभंग आज आपण गुणगुणतो.

दिवसाच्या संगीतमय सुरुवातीने दिवसभराच्या कामांचा ताण जाणवत नाही. काम करताना संगीत ऐकल्याने कामाचे ओझे वाटत नाही. संगीत ऐकल्याने आपल्यातील मरगळ दूर होऊन आपण ताजेतवाने होतो. धकाधकीच्या जीवनात शारीरिक मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण व्यायामशाळा, सायकलिंग, जॉगिंग सारखे पर्याय निवडतो. कालांतराने या पर्यायाचासुद्धा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे व्यायामशाळा, सायकलिंग किंवा जॉगिंगगला जाताना धीम्या आवाजात संगीत ऐकल्याने व्यायामाचाही कंटाळा येणार नाही.

शारीरिक कष्टाची कामे करताना संगीत ऐकल्याने कामे करताना गती प्राप्त होते. दिवसभरात कार्यालयीन कामे केल्याने शारीरिक त्रासाबरोबर, प्रचंड मानसिक तानालाही सामोरे जावे लागते. परिणामी निद्रानाशासारख्या आजारांना आपण बळी पडतो. त्यामुळे रात्री विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्यास शांत झोप लागते. डॉक्टर्स सुद्धा मानसिक तणाव दूर करण्यासाठी संगीत थेरपीचा मार्ग सुचवतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच करमणूक म्हणून संगीताचा आस्वाद नक्की घ्यावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here