घरलाईफस्टाईलगुळाचा भात

गुळाचा भात

Subscribe

गुळाचा भात रेसिपी

बऱ्याचदा गोड पदार्थ म्हटला की, गोडाचा शिरा, शेवयाची खीर आणि रव्याची खीर असे पदार्थ केले जातात. मात्र, हे गोडाचे पदार्थ खाऊन नेहमी कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण आगळावेगळा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे गुळाचा भात.

साहित्य

- Advertisement -

१ कप भिजवून घेतलेले तांदूळ
किसलेला गुळ ३ मोठे चमचे
तूप ३ मोठे चमचे
काजू आणि किसमिस १० ते १२
सुंठ आणि वेलची पावडर अर्धा चमचा
मीठ चिमुटभर

कृती

- Advertisement -

एका नॉन स्टिक भांड्यात तूप थोडेसे गरम करा. त्यानंतर त्यात काजू आणि किसमिसचे तुकडे परतून घ्यावे. त्यानंतर त्यावर तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घेऊन त्यावर २ कप पाणी घालून पुन्हा हलवून घ्या. आता त्यावर सुंठ आणि वेलची पावडर घालून एकजीव करून घ्या आणि उकळी येण्याची वाट बघा. उकळी आली की कमी आचेवर पाणी आटेपर्यंत ठेवा आणि अधून मधून हलवत रहा. तुमचा झटपट असा गुळाचा भात खाण्यास तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -