खमंग ज्वारीचा हुरडा

खमंग ज्वारीचा हुरडा रेसिपी

Mumbai
jowar hurda recipe in marathi
खमंग ज्वारीचा हुरडा

बऱ्याचदा नाश्ताला काय कराव, असा प्रश्न अनेकांना पडतो. काहीतरी चटकदार पण घरी बनवलेलेच खावे, असे देखील सातत्याने वाटत असते. अशावेळी तुम्ही खमंग असा ज्वारीचा हुरडा करु शकता.

साहित्य

१ मोठी वाटी ज्वारीचा हुरडा
१ बारीक चिरलेला कांदा
हिरव्या मिरच्या २
कोथिंबीर
दही किंवा लिंबू
मीठ
हळद
हिंग
मोहरी
तेल
चिमुटभर साखर

कृती

सर्वप्रथम हुरडा भरड वाटून घ्या. त्यानंतर एका कढईत फोडणीसाठी तेल कडकडीत गरम करून घ्या. त्यात हिंग, हळद, मोहरी आणि हिरव्या मिरच्या घाला आणि चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येई पर्यंत परतून घ्या. त्यात भरडलेला हुरडा घालून खमंग परता आणि त्यानंतर मीठ आणि चमचाभर दही, साखर घालून नीट मिसळून घ्या. थोडे पाणी घालून झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. अशाप्रकारे तुमचा खमंग असा हुरडा तयार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here