डिप्रेशन घालवण्यासाठी चालत रहा!

Mumbai
Depression

डिप्रेशन हा आजार समाजात वाढू लागला आहे. त्यावर अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात, परंतु, निराशेला घालवण्यासाठी चालणे हा सुद्धा एक साधा उपाय आहे. चालण्यामुळे निराशा काही प्रमाणात छूमंतर होते, असे संशोधनातून आता सिद्ध झाले आहे. भरपूर व्यायाम केल्यानंतरही डिप्रेशनची पातळी मोठ्या प्रमाणात खाली जाते, परंतु नैराश्यातून येणार्‍या परिणामांचा प्रभाव किती राहतो हे मात्र समजू शकत नाही. सध्या दहापैकी एका व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात कसल्या ना कसल्या कारणामुळे नैराश्य घर करून असते. त्यावर मात करण्यासाठी अमली पदार्थांची मदत घेतली जाते. नैराश्य पिच्छा सोडत नसेल तर डॉक्टर मंडळी व्यायामाचा सल्ला आवर्जून देतात. त्यामुळे नैराश्याची लक्षणे काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला आहे. त्यांनी याकरिता तीनशेहून अधिक लोकांचा अभ्यास केला. त्यावरुनच डिप्रेशनची लक्षणे अर्थात त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम उपाय असल्याचे लक्षात आले आहे. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होतेच, शिवाय त्याचा प्रभावही कमी होत असल्याने व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने ते पूरक ठरणार आहे. चालणे ही अत्यंत साधी प्रक्रिया आहे. त्यासाठी खर्चही येत नाही. त्यामुळे चालण्याचे फायदे अनेक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here