घरलाईफस्टाईलस्वादिष्ट खरवस रेसिपी

स्वादिष्ट खरवस रेसिपी

Subscribe

असा तयार करा स्वादिष्ट 'खरवस'

थंडीच्या दिवसात प्रोटीन आणि कॅलरीयुक्त आरोग्यदायी पदार्थ खाणे फार महत्त्वाचे असते. अशावेळी चवीला गोड असणारा खरवस खाल्ल्यास अति उत्तम. त्यामुळे आज आपण घरच्या घरी खरवस कसा बनवता येईल हे पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक
१ लिटर दूध
२०० ते २५० ग्रॅम साखर
२-३ चिमटी केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड

कृती

- Advertisement -

केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे. त्यानंतर चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी. नंतर केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे. त्यानंतर कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी. ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे आणि नंतर फ्रीजमध्ये गार करून खावे, अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी खरवस तयार.


हेही वाचा – खमंग ज्वारीचा हुरडा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -