खवय्यांचे डेस्टीनेशन हैदराबाद

केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव जाणवते.

Mumbai
kabab

हैदराबाद म्हणजे खवय्यांचे डेस्टीनेशन. साधारणत: सहा महिन्यांपूर्वी हैदराबादेत जाण्याचा योग आला होता. त्यावेळी हैदराबादेतील प्रेक्षणिय स्थळे बघण्यापेक्षा तेथे चांगले काय खायला मिळते, याकडे जास्त लक्ष होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरले होतो त्या हॉटेलच्या बाहेरच इडली-डोसाची गाडी लागायची. येथे उपमा बटर डोसा नावाचा अप्रतिम प्रकार प्रथम चाखला. तव्यावर डोसा टाकून त्यावर भरपूर अमूल बटर टाकायचे. त्यावर पातळ उपमा आणि चटणी लावून त्याला अगदी खरपूस रोख केले जायचे. येथील इडली चटणीही खास असते. तसेच कांदा, टोमॅटो टाकून चांगली फ्राय केलेली इडली आणि वडा फ्राय ही देखील येथील खासयित आहे.

येथील सर्वात लोकप्रिय हॉटेल म्हणजे हॉटेल पॅराडाइज. येथील बिर्याणी जगप्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. आमच्या गाईडने त्याची माहिती दिल्यावर आमचा मोर्चा त्याच रात्री हॉटेल पॅराडाइजकडे निघाला. या हॉटेलमध्ये क्रिकेटपट्टू, राजकारणी, बॉलीवूड कलाकारापासून अनेक सेलिब्रेटी आपली हजेरी लावतात. या हॉटेलची स्पेशालिटी बिर्याणी आहे यात वाद नाही. पण येथील कबाबही लाजवाब आहेत. अर्थात हे आम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर कळले. त्यामुळे सुरुवात येथील सीख कबाबपासून झाली. हा कबाब वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम असतो. तो पुदीनच्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो. चटणीत बुडवून हाताने तोंडात टाकलेल्या कबाबचा तुकडा केवळ जीभेवरच नव्हेतर मनातही रुंजी घालतो. त्यानंतर येणारी मेन कोर्स बिर्याणी म्हणजे जिभेची केवळ चोचलेच नव्हेतर जीभेची आराधना असते. मऊ शिजलेला, एक एक दाणा मोकळा असलेला भात, त्यात चिकनाच पिस. सोबतच दोन कबाबचे पिस आणि मिरचीचे सालन आणि रायता. एक-एक घास पोटात शिरताना खरंच एक स्वर्ग सुख असते. मिरची का सालन हा एक खास हैद्राबादी प्रकार. बिर्याणी सोबत तर हा हवाच. तिळाच्या कुटाच्या रश्शात केलेली हिरव्या मिरच्यांची करी म्हणजे हे मिरची का सालन. किंचित कोकम पण घातलेले असल्याने त्या ग्रेवी ला एक घरगुती टेस्ट जाणवते.

केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. आम्ही हैदराबादेत असताना एक साधारण श्रीकृष्ण नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. दुपारची वेळ होती. त्यात गुरुवार होता. त्यामुळे फक्त राईस प्लेट मागवली. फणसाची सुखी भाजी, बटाट्याच्या रस्सा भाजी, खोबर्‍याची चटणी, हैदराबादी सांंभार, दही, भाता आणि कोकणात केल्या जातात तशा पोळ्या, असा साधा मेनू होता. पण तेही पदार्थ चिभेला इतके रुचकर लागले की विचारून सोय नाही. त्या प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव होती. अगदी साधे दही चविष्ट होते. त्यानंतर घेतलेल्या फिल्टर कॉफीचा स्वाद म्हणजे स्वर्ग सुख होते. तुम्ही कधी हैदराबादेत गेलात तर हॉटेल पॅराडाईजमध्ये नक्की जा. पण त्या अगोदर रस्त्यावरील गाडीवर इडली, डोसा अशा साध्या पदार्थांचाही स्वाद घ्या. कुठल्याही शाकाहारी हॉटेलात शिरा आणि मात्र हैदराबादेची खास ओळख असलेले पदार्थ नक्की चाखा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here