किचन टीप्स –

Mumbai
Kitchan tips

*दुध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्यामध्ये सोडा किवा साखर घालून ठेवा ( सोड्यापेक्षा साखर बरी ) (मात्र चहा /कॉफी साठी वापरायचे असेल किवा दुधाचा गोड पदार्थ करायचा असेल (खीर) तर ही दुध टिकवण्यासाठी अगोदर घातलेली साखर विचारात घ्या)

*कॉफीप्रेमींसाठी – इन्स्टंट कॉफी व साखर यांच्या मिश्रणावर एखादा चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावं, दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं. सुंदर स्वाद व फ्लेवर येतो.

*इन्स्टंट कॉफी बनवताना साखर आणि दुधाची पावडर मिक्सरमध्ये बारीक/एकजीव करा. कपात घेऊन त्यावर गरम पाणी/दुध घालून ढवळा.

*गुळाच्या पोळ्या करतेवेळी पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात आही असे झाले तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.

*फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.

*अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.

*लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर सोलून साठवून ठेवाव्यात. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

*सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here