Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : स्वयंपाकघरातील 'या' टिप्स येतील कामी

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील ‘या’ टिप्स येतील कामी

Subscribe

स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्वयंपाकघरातील टिप्स

ABC Cooking Challenge — What Is My Health

- Advertisement -
  • कोथिंबीर आणल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी निवडावी. मग एक प्लॅस्टिकचा आडवा डबा घेऊन त्यात एखादे मोठ्या रूमालाइतके सुती/कॉटनचे कापड ठेवून त्यात ही निवडलेली कोथिंबीर ठेवली व त्याच कापडाच्या टोकांनी झाकली आणि मग डब्याचे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताजी राहते. फक्त जेव्हा जेव्हा कोथिंबीर घेण्यासाठी डबा उघडू त्यावेळी जर एखादे खराब झालेले पान दिसले तर ते लगेच काढून टाकायचे.
  • कडूलिंबाची पानं काढून ती एखाद्या एअर टाइट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस चांगली राहातात. कडूलिंब घेण्यासाठी जेव्हा जेव्हा डबा उघडू तेव्हा जर काही पानं खराब झाली असतील तर ती पाने काढून टाकावी.
  • कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो. हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे (पाव चमचा) मीठ पण घालावं म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.
  • कणिक मळताना ती परातीत/ताटात न मळता कढई/ मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते.
  • कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेल/तूपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात किंवा तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाहीत.

20 Quick Cooking Tips — SMART CHICKEN

 

- Advertisement -

 

  • कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज 10-15 मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत5  मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.
  • कोणताही पुलाव/जिरा राइस/स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा/फडफडीत होतो.
  • गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.

हेही वाचा :

Navratri 2023 : नवरात्रीत झटपट बनवा उपवासाचे मोमोज

- Advertisment -

Manini