घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील किड्यांना 'असे' लावा पळवून

स्वयंपाक घरातील किड्यांना ‘असे’ लावा पळवून

Subscribe

बऱ्याचदा स्वयंपाक घरातील धान्यात किडे आढळून येतात. मात्र, हे घालवायचे कसे असा अनेकदा गृहिणींना प्रश्न देखील पडतो, अशा गृहिणींकरता आज खास टीप्स घेऊन आलो आहोत.

  • डाळींना किड्यापासून वाचण्यासाठी त्यात एरंडेल तेलाचे काही थेंब टाकावे. याने डाळीत किडे किंवा अळ्या होणार नाहीत.
  • मिरचीच्या डब्यात थोडेसे हिंग टाकल्याने मिरची जास्त काळ टिकते.
  • कांदे आणि बटाटे एका जागेवर एकत्र ठेवू नये, यामुळे बटाटे लवकर खराब होतात.
  • जर मुंग्यांमुळे त्रस्त असाल तर एक काम करा. ट्युब लाइट किंवा बल्बच्याजवळ कांद्याची एक गाठ लटकवून ठेवू शकता. यामुळे मुंग्या दूर राहतात.
  • स्वयंपाक घराच्या कानाकोपऱ्यात बोरिक पावडर टाकल्याने झुरळ येत नाहीत.
  • कॉफीची पूड जाळून त्याचा धूर केल्यास त्या धुराणे घरातील डास पळून जातात.
  • ज्या ठिकाणी मुंग्या असतील त्याठिकाणी कापुर टाकावा. यामुळे मुंग्या कमी होतात.
  • घरात झुरळ झाली असतील तर घरातील कानाकोपऱ्यात तेजपत्ताची पूड करुन किंवा अख्खे तेजपान ठेवावे. यामुळे झुरळे कमी होतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -