घरलाईफस्टाईलझटपट ‘किचन टीप्स’

झटपट ‘किचन टीप्स’

Subscribe

स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी ४-५ दिवस जास्त टिकतात. आपण केळी एकाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली तरीही वरुन जरी काळी दिसली तरी आत उत्तम रहातात.
  • acidity वर एक अगदी सोपा उपाय. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. एका दिवसात acidity बरी होते. (निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावायची चुन्याची ट्यूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची आणि ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. या पाण्यालाच निवळी म्हणतात.)
  • पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळताना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
  • फ्लॉवर शिजवतांना त्यात दूध आणि किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पांढरा शुभ्र आणि तजेलदार रहातो.
  • ब्रेडक्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाईसच्या ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरा! एकदम फाईन ब्रेडक्रम्स होतात.
  • हिरव्या मिरच्या विकत घेताना बरोबर थोड्या तिखट छोट्या मिरच्या पण घ्या. कारण कधी कधी मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. त्या वेळेला आपला अंदाज चुकतो. त्या वेळेला या तिखट मिरच्या कामाला येतात.
  • मिरची तिखट निघाली तर ती मिठा बरोबर चुरडून घालू नका. तिचा तिखट पणा वाढतो. मीठ वेगळे घाला आणि मिरच्याचे तुकडे वेगळे घाला. तसेच भाजीत किंवा आमटीत घालणार असल्यास मोठे तुकडे घाला आणि जास्त उकळू देऊ नका काढून टाका.
  • कोथिंबीर घेताना तिची मुळे ताबडतोप कापून टाका. बरेचदा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळच्या ठिकाणी सडलेली असते. त्यामुळे कापली नाहीत तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते.
  • कोथिंबीरच्या काड्या आणि पाला वेगळा निवडून ठेवा. काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाण्या एव्हडे त्यांचे बारीक तुकडे करून ठेवा आणि ते एखाद्या बिन झाकणाच्या डब्यात ठेऊन फ्रीज मध्ये एक दोन दिवस ठेवा म्हणजे सुखून जातात. नंतर झाकण लावून ठेवा बरेच दिवस टिकतात. या काड्यांनाच जास्त चव आणि स्वाद असतो. बारीक कापलेल्या काड्या फोडणीमध्ये, चटणी करताना वापरा.
  • अमूल बटरपेक्षा अमूल लाईट वापरणे चांगले. प्रकृती साठी आणि खिश्यासाठीही. चवीत फारसा फरक नसतो.
  • दूध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्या मध्ये सोडा किवा साखर घालून ठेवा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -