Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर लाईफस्टाईल जेवणाची चव वाढवण्यासाठी खास टीप्स

जेवणाची चव वाढवण्यासाठी खास टीप्स

‘किचन टीप्स’

Mumbai
kitchen tips in marathi
जेवणाची चव वाढवण्यासाठी खास टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • तळणीचे मोदक करताना पारीचे पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बऱ्याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते. नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दूध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
  • तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
  • पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत. ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्तवेळ तळल्याने जळणार नाहीत.
  • आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण-भाताचे त्यात गव्हाचे, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद जिरेपूड, चिरलेला कांदा, लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते.
  • रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपण सकाळी फोडणीचा भात करतो. त्यावेळी जर मेतकूट हाताशी असेल तर भातात ते वापरता येईल. फोडणीत काजू घातले तरी चालतील. त्याखेरीज राजमा, मटार, गाजराचे तुकडे, फरसबी इ. भाज्या घालूनही भाताला वेगळेपण आणता येईल. मेतकूटामुळे भाताला पिवळसर छान रंग येतो आणि त्यामुळे फोडणीत हळद घातली नाही तरी चालते.
  • गुळाच्या पोळ्या करतेवेळी पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
  • ३-४ दिवस लिंबे ताजी रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरावीत.
  • पाहुण्यांसाठी किंवा पार्टीसाठी पचडी करायची असेल तर आधीपासून फक्त पचडीतील घटक भाज्या चिरून ठेवाव्यात. पचडीत लिबाचा रस, साखर, मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी करून ठेवली तर ती पांचट आणि पाणीदार, बेचव लागते. त्यावर हा उत्तम उपाय आहे.
  • पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.
  • पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here