घरलाईफस्टाईलकिचन स्वच्छ ठेवण्यासाठी खास टीप्स

किचन स्वच्छ ठेवण्यासाठी खास टीप्स

Subscribe

किचन स्वच्छ ठेवण्यासाठी खास घरगुती टीप्स

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात घर आणि किचन स्वच्छ करायला गृहिणांना वेळ नसतो. मात्र, अशा काही टीप्स आहेत ज्यांनी घर आणि किचन चकचकीत ठेवण्यास मदत होते.

कॅबिनेट्सवरील तेलाचे डाग

कॅबिनेट्सवर लागलेले तेलाचे डाग ऑलिव्ह ऑयलने स्वच्छ करा. टिशू पेपरवर ऑलिव्ह ऑयलचे काही थेंब घेऊन तेलाचे डाग असलेल्या कॅबिनेट्सवर फिरवा. तेलाचे डाग जाण्यास मदत होईल.

- Advertisement -

डाइनिंग टेबल

डाइनिंग टेबलाला स्वच्छ करण्यासाठी नीलगिरीचे तेल वापरावे. जर टेबलावर दुर्गंध येत असेल तर एखाद्या कापडावर नीलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने डाइनिंग टेबल पुसून घ्या यामुळे डाइनिंग टेबल चकचकीत ठेवण्यास मदत होते.

फ्रीज

फ्रीजच दार उकळलेल्या बटाट्याच्या सालांनी स्वच्छ केले जाऊ शकते.

- Advertisement -

स्टोव

स्टोव स्वच्छ करण्यासाठी संत्र्याचे साल वापरावे. संत्र्याच्या सालाने सुवास ही येतो आणि डागही कमी होण्यास मदत होते.

नळ

किचनमधील नळ चकचकीत करण्यासाठी त्यावर थोडेशी टूथपेस्ट लावा आणि गरम पाण्याने धुऊन टाका. यामुळे नळ चकचकीत होतो.

खिडकी आणि दार

काचेची खिडकी किंवा दार गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने स्वच्छ करा. याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -