स्वयंपाक घरातील खास ‘किचन टिप्स’

झटपट ‘किचन टीप्स’

kitchen tips in marathi
स्वयंपाक घरातील खास 'किचन टिप्स'

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • डाळ किंवा तांदळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ, तांदूळास बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे.
  • दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी. दही घट्ट होते.
  • भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकण्यास मदत होते.
  • भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही.
  • पुऱ्यांसाठी कणीक भिजवतांना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
  • रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात.
  • किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
  • कढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात.
  • गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून, मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात.
  • कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी दररोज बदलावे.