घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील १० उपयुक्त सल्ले

स्वयंपाक घरातील १० उपयुक्त सल्ले

Subscribe

झटपट ‘किचन टीप्स’

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
  • फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
  • आपण दररोज ठराविक भांड्यात आपण चहा करतो. त्यास पडलेले चहाचे डाग जात नाहीत. म्हणून ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
  • पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
  • जर हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असेल तर चणा डाळीचे (बेसन) पीठ चोळावे आणि साबण लावून हात धुतल्यानंतर वास जातो.
  • ताक आंबट असल्यास त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे. आंबटपणा कमी होईल.
  • ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
  • ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
  • कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
  • कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -