घरलाईफस्टाईलरुचकर जेवणासाठी खास टीप्स

रुचकर जेवणासाठी खास टीप्स

Subscribe

झटपट ‘किचन टीप्स’

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफवून घ्यावेत.
  • इडली मऊ होण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. इडलीच्या मिश्रणात थोडेसे खोबऱ्याचे तेल घालावे.
  • हाताला येणाऱ्या लसणाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबाचा तुकडा हाताला चोळावा.
  • कोबीची भाजी बनवत असताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जातो.
  • कांदा परतताना त्यात चिमूटभर साखर घालावी, यामुळे कांदे चांगले परतले जातात.
  • मटण शिजवताना त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होते.
  • भाजीमध्ये फ्लॉवरचा रंग पांढरा शुभ्र दिसण्यासाठी एक चमचा कणीक घालावी.
  • बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने तुटत नाही.
  • टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे.
  • शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -