उत्तम स्वयंपाकासाठी खास ‘टिप्स’

Woman in a kitchen
किचन टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे.
  • चपाती किंवा पराठ्याच्या कणकेमध्ये जरासे दूध मिसळल्यास ते छान मऊ आणि चविष्ट होतात.
  • केशर मायक्रोवेव किंवा तव्यावर गरम करुन घातल्यास स्वाद अधिक छान येतो.
  • कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवडाभर छान टवटवीत राहतात.
  • भजीच्या पीठात थोडा लिंबाचा रस घातल्याने भजी कमी तेल शोषते.
  • पुरी करण्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्या तेल कमी शोषतात.
  • आमरसाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिक्स करुन घालावा.
  • साखरेचा पाक केल्यानंतर त्यात पुन्हा साखरेचे कण होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
  • पुलात संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळल्यास पुलावला छान स्वाद येतो.
  • इडली पात्रातील इडल्यावर थोडे गार पाणी शिंपडल्यास इडल्या व्यवस्थित आणि पटापट निघतात.