रुचकर जेवणासाठी खास किचन टिप्स

झटपट ‘किचन टीप्स’

रुचकर जेवणासाठी खास किचन टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो.
  • बदाम जर १५ – २० मिनिट गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते.
  • लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या कि त्याची साल पटकन निघण्यास मदत होते.
  • इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकळलेले तांदूळ मिक्स करावे. यामुळे इडली मऊ होते.
  • जास्त लिंबाच्या रसासाठी ५ ते १० मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
  • सुख खोबर खराब होऊ नये, याकरता तुरडाळीत ठेवावे यामुळे सुक खोबर खराब होत नाही.
  • चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.
  • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.
  • तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.
  • डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.