गृहिणींसाठी खास स्वयंपाक टीप्स

झटपट ‘किचन टीप्स’

Mumbai
kichen tips
किचन टीप्स

स्वयंपाक करताना अनेकदा गृहिणींना पदार्थ रुचकर होण्यासाठी काय करावे हे कळत नाही. मात्र, पदार्थ रुचकर होण्यासाठी काही खास किचन टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरण्यास मदत होईल. जाणून घेऊया अशा खास किचन टीप्स.

कुरकुरीत भजे बनविण्यासाठी

भजे कुरकुरीत बनविण्यासाठी मिश्रणात मक्याचे पीठ घालावे, यामुळे भजे कुरकुरीत होते.

टमाटरचा पल्प पटकन काढण्यासाठी

टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून त्यात थोडे मीठ घालून उकळावे. त्यानंतर त्याची साल पटकन काढता येतात. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी आणि ज्युससाठी करता येतो.

नरम आणि मोकळा भात बनवण्यासाठी

तांदुळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात १ चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.

कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी

पुऱ्याच्या कणकेत २ चमचे गरम केलेले तेल घाला. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होण्यास मदत होते.

लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी

उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धुऊन नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास आणि फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here