घरलाईफस्टाईलकिचन टिप्स, मेकअप ब्रशची सफाई

किचन टिप्स, मेकअप ब्रशची सफाई

Subscribe

किचन टिप्स  kichan

*लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते.

*आल्याच्या वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावेत, त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.

- Advertisement -

*हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो.

*कोथिंबिरीच्या काड्या आणि पाला वेगळा निवडून ठेवा. काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाण्या एव्हडे त्यांचे बारीक तुकडे करून ठेवा आणि ते एखाद्या बिन झाकणाच्या डब्यात ठेऊन फ्रीजमध्ये एक दोन दिवस ठेवा म्हणजे सुखून जातात . नंतर झाकण लावून ठेवा बरेच दिवस टिकतात, या काड्यांनाच जास्त चव आणि स्वाद असतो.

- Advertisement -

*पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.

 

मेकअप ब्रशची सफाई   

मेकअप ब्रश

 

रोज वापरण्यात येणार्‍या मेकअप ब्रशची स्वच्छता करणेही आवश्यक आहे. यात जमणारे अंश स्किन आणि आय इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात.

*मेकअप ब्रशमध्ये डस्ट, ऑईल आणि बॅक्टेरिया जमत असतात. म्हणून जितका ब्रशचा वापर असेल त्याप्रमाणे तो स्वच्छही केला गेला पाहिजे.

*एका बाऊलमध्ये दोन तृतियांश पाणी आणि एक तृतियांश व्हिनेगर टाकून ब्रश भिजवून ठेवा. काही वेळानंतर ब्रश पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

*नियमित क्लिंजरने ब्रश स्वच्छ करावा. त्यामुळे ब्रशची घाण बाहेर निघून जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -