किवी काजू रोल

Mumbai
kiwi kaju roll
किवी काजू रोल

बऱ्याचदा आपल्या घरात फळे राहतात आणि त्याचे काय करावे, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. अशावेळी तुम्ही घरच्या घरी किवी काजू रोल नक्की ट्राय करु शकता. चला तर पाहुया किवी काजू रोलची रेसिपी.

साहित्य

  • २ किवी
  • १/२ वाटी साखर
  • १/२ वाटी मिल्क पावडर
  • १ वाटी काजू (पावडर करुन घ्यावी)
  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • तुप
  • खाण्याचा हिरवा रंग

कृती

सर्वप्रथम किवीची साल काढून घ्यावी. त्यानंतर किवीचे छोटे तुकडे करुन मिक्सरला लावून घ्या. नंतर बारीक केलेली किवी पॅनमध्ये घ्या आणि ५ मिनिटे बारीक गॅसवर परतून घ्या. आता त्यामध्ये साखर घालून एकत्र करुन घ्या. मिश्रण हलवत रहा. ५ मिनिटे झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर, बारीक केलेली काजूची पावडर घालून एकत्र करुन घ्या. नंतर खाण्याचा हिरवा रंग आणि थोडस तुप घालून छान एकत्र करुन घ्या. एकसारख १० ते १५ मिनिटे हलवत रहा. जेव्हा मिश्रण पॅनपासून पूर्ण वेगळ होईल तेव्हा गॅस बंद करा. एका ताटाला थोडेसे तुप लावून मिश्रण ताटात घ्या. मिश्रण थोडेसे थंड होत आलेकी थोडेसे तुप ताटाला लावून मिश्रणाचे आवडीप्रमाणे छोटे मोठ्या आकारात रोल करुन घ्या. नंतर किवी काजू रोल खोबऱ्याच्या किसमध्ये सर्व बाजूने फिरवून घ्या. हे रोल फ्रिजमध्ये १ तास सेट करायला ठेवा, अशाप्रकारे किवी काजू रोल तयार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here