स्तनांच्या बदलांकडे लक्ष द्या, कॅन्सरची शक्यता

अजूनही ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याची लक्षणांबाबत महिलांमध्ये जागृती नाही. पण, जर ब्रेस्ट कॅन्सर लवकरात लवकर निदान झालं तर ब्रेस्ट काढण्यापासून वाचवता येऊ शकतात.

Mumbai
Breast
प्रातिनिधिक फोटो

केईएम रुग्णालयात अनेक प्रकारच्या स्तनांच्या विकारांवर उपचार केले जातात. २०११ पासून ते २०१८ पर्यंत ५ हजार ५०० रुग्णांची तपासणी केली गेली. त्यातील ५०० हून अधिक रुग्णांना स्तनांचा कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे जी एक गंभीर बाब आहे. तर, अजूनही ९० टक्के रुग्ण हे पुढच्या टप्प्यातील येतात. कारण, अजूनही ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याची लक्षणांबाबत महिलांमध्ये जागृती नाही. पण, जर ब्रेस्ट कॅन्सर लवकरात लवकर निदान झालं तर ब्रेस्ट काढण्यापासून वाचवता येऊ शकतात.

कर्करोगाशी लक्षणे

स्तनाला एखादी गाठ जाणवणं किंवा काखेत गाठ होणं, ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. पण, याशिवायही स्तनांमध्ये अनेक बदल होतात. स्तनांमधील अशाच बदलांकडे किंवा स्तनांच्या दुखण्यांकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. पण, स्तनांमधील बदल आणि दुखणं हे एकप्रकारे संसर्ग असू शकतो आणि त्याचं वेळीच निदान उपचार न झाल्यास कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. त्यासोबतच, फायब्राईड, अॅप्ससेस, क्रॉनिक मॅसकॉईटिस, पुरुषांमध्ये गायनॅको मॅसकॉईटिस असे विकार असतात. तर, ५५०० पैकी २००० पेक्षा जास्त रुग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

पुढच्या टप्प्यातील कॅन्सरमधील ३५ टक्के ब्रेस्ट वाचवण्यात यश 

ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिला अनेकदा पुढच्या टप्प्यात येतात. त्यामुळे कॅन्सर दुसऱ्या अवयवांमध्ये पसरु नये यासाठी अधिकतर ब्रेस्ट काढून टाकावी लागते. पण, आता नव्याने करत असलेल्या संशोधनातून ३० ते ३५ टक्के ब्रेस्ट वाचवण्यात यश येत आहे. रुग्णांना किमोथेरपी, हार्मोनल थेरेपी, कॅन्सरचा आकार कमी करुन ब्रेस्ट वाचवण्यात आले आहेत. त्यानंतर इंम्प्लांट न वापरता रुग्णांचे स्वत: चे टिश्यूस वापरुन रिकंट्रक्शन केलं जातं. ४० ते ५० वयोगटातील महिलांना हा आजार जास्त होत असल्याचं दिसून येत असल्याचं केईएम रुग्णालयाच्या जनरल सर्जरी विभागाच्या प्राध्यापक आणि ब्रेस्ट सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा राव यांनी सांगितलं.

“२०११ ते १८ या कालावधीत रुग्णालयात साडेपाच हजार महिला स्तनाचे विकार असलेल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यातील ५०० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचं समोर आलं. तर २ हजार महिलांवर शस्त्रक्रिया करून त्यांन बरं करण्यात आलं. २०१८ – १९ या वर्षांत रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या १०० महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या स्तन कसे काय वाचवता येऊ शकतात ? यावर संशोधन केलं जातं. टाटा रुग्णालयातून ही बरेच रुग्ण इथे पाठवले जातात. पण, जनजागृती करणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स, बोर्ड्स लावले जातात. प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणं ही महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक लाईव्ह ट्रेनिंग दिलं गेलं. ज्यामुळे, मॅमोग्राफी कशी केली जाते याचं ही ट्रेनिंग दिलं जातं.” – डॉ. शिल्पा राव , ब्रेस्ट सर्जरी विभाग प्रमुख, जनरल सर्जरी विभागाच्या प्राध्यापक केईएम रुग्णालय

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here