घरलाईफस्टाईलकॉस्मेटिक सर्जरीचे सकारात्मक परिणाम

कॉस्मेटिक सर्जरीचे सकारात्मक परिणाम

Subscribe

सुंदर, सतेज दिसण्यासाठी 'कॉस्मेटिक सर्जरी' चा पर्याय

नेहमी चिरतरुण, सुंदर दिसांव अशी महिलांची नेहमीच इच्छा असते. परंतु जसे जसे वय वाढत जाते तसं चेहऱ्याच्या त्वचेत अनेक बदल होत असतात. यामुळे अभिनेत्री, मॉडेल किंवा आता अनेक तरुणी सुंदर, सतेज दिसण्यासाठी ‘कॉस्मेटिक सर्जरी’ करुन घेत असतात. या कॉस्मेटिक सर्जरीचा मुख्य उद्देश चेहऱ्यावरील त्वचेला सुंदर करणे असतो. त्यामुळे अधिक तर लोक कमी वेळात अधिक सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा विचार करतात. परंतु यासंदर्भात अधिक महिती नसल्याने अनेक स्त्रीया संभ्रमात असतात. परंतु या कॉस्मेटिक सर्जरीचे चेहऱ्यावर काय वाईट परिणाम होतात हेच आपण ऐकून आहे परंतु आज आपण कॉस्मेटिक सर्जरीचे काय सकारात्मक परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत.

कॉस्मेटिक सर्जरी काय असते?

कॉस्मेटिक सर्जरीचे होणारे फायदे जाणून घेण्याआधी कॉस्मेटिक सर्जरी काय असते हे जाणून घेऊ. कॉस्मेटिक सर्जरीचा मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अधिक सुंदर बनवणे. सौंदर्य अबाधित राहण्यासाठी चेहऱ्यावर कंटेरिंग करण्यापासून ते ब्रेस्ट इंप्लाटेशन, बॉडी कंटेरिंग, स्किन व फेस रिज्युविनेशन अशा विविध उपचार पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे व्यक्तीच्या चेहरा, शारिरीक ठेवण ह्यात सकारात्मक बदल केले जातात.

- Advertisement -

सौदर्य खुलवणे

कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा महत्त्वाचा उद्देश व्यक्ती सौंदर्य खुलवणे आहे. कॉस्मेटिक सर्जरीमुळे व्यक्तीला स्वत;च्या लूकमध्ये हवा असलेला बदल करता येतो. परंतु सर्जरीनंतर मिळणाऱ्या रिजल्टवर नापसंती दर्शवण्याआधीच कॉस्मेटिक सर्जनशी आपल्या लुक्सविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.

शारिरीक आरोग्य सुधारणे

कॉस्मेटिक सर्जरीने शारिरिक आरोग्य सुधारण्यास मदत होत असते. काही कॉस्मेटिक सर्जरी शारिरीक आरोग्य सुधारण्यात अतिशय फायदेशीर असतात. उदा. राइनोप्लास्टी सर्जरी ना केवळ आपल्या नाकाचा आकार किंवा ठेवण बदलते तर श्वसनासंबंधीत समस्सांना सुधारण्यासाठीही मदत करते.

- Advertisement -

कॉस्मेटिक सर्जनच्या माहितीनुसार, कॉस्मेटिक सर्जरी फक्त चिरतरुण, सुंदर बनवण्याचे काम करत नसुन त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होत असतो. कारण आत्ताच्या जगात व्यक्तिच्या अंतर्गत सौदर्याला महत्त्व नसून बाहेर सौदर्याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे सुंदर दिसत असल्यास आत्मविश्वास देखील अधिक वाढतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती आपल्या दिसण्यावरुन ताणतणावाचा सामना करत असतात अशा व्यक्तींना सर्जरीनंतर एका वेळा आत्मविश्वास मिळतो आणि त्या तणतणावापासून मुक्त होत मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -