आरोग्यदायी ‘कोकम सरबत’

हे आहेत कोकम सरबताचे आरोग्यदायी फायदे

Mumbai
kokum sharbat health benefits
आरोग्यदायी 'कोकम सरबत'

कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. अशावेळी थंड पेयाचे सेवन करावेसे वाटते. मात्र, बंद पॅकेटमधील पेय शरीरास घातक ठरतात. मात्र, घरच्याघरी तयार करण्यात आलेले कोकम सरबताचे सेवन नेहमीच शरीरास उत्तम आणि औषधी असते. जाणून घेऊया कोकम सरबताचे आरोग्यदायी फायदे.

 • कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, पण त्याबरोबरच हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड नावाचा अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायक घटक असतो. त्याचप्रमाणे मँगनीज, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अशी खनिजेही असतात.
 • कच्चे कोकम हे वात आणि पित्त दोषाचे निवारण करते. तर परिपक्व फळ हे कफ आणि वातदोषाचे निवारण करते. त्यामुळे कोकमाचे सेवन करणे नेहमीच चांगले.
 • कोकममध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे गर्भिणीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे.
 • कोकम सरबत पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.
 • अँटी फंगल आणि अँटिऑक्सिडंट हे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
 • कोकम सरबतमुळे इन्सुलिनचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते.
 • नवीन संशोधनावरून कोकम हे आंतरिक अल्सरमध्ये उपयुक्त ठरते.
 • कोलेस्टेरॉलचे प्रमाण कायम ठेवून हृदयाचे आरोग्य कायम ठेवते. तसेच कार्डिओ टॉनिक असते. यामुळे कोकम सरबताचे सेवन केल्यास आराम मिळतो.
 • शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये असतो.
 • कोकम त्वचा आणि केसासाठी उत्तम असते.
 • हायड्रो-सायट्रिक अॅसिड हा घटक प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here