घरलाईफस्टाईलअंडी खाताना अशी घ्या काळजी

अंडी खाताना अशी घ्या काळजी

Subscribe

अंड्याचे पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं म्हटलं जातं. तसेच व्हिटामिन ए , डी बरोबरच मुबलक प्रोटीन्स असलेली अंडी तब्येतीसाठी उत्तम असली तरी ती पचायला उष्ण असतात. त्यामुळे अंड्याचे पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याची माहीती असणं आवश्यक आहे, अन्यथा अंडी अंगी लागण्याएवजी अंगाशी येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच या काही खास टिप्स.

अंड खाताना एकतर ते पूर्ण शिजलेले असावे किवां पूर्ण कच्चे असावे. अर्धे कच्चे किंवा अर्धे शिजलेले अंड तुम्हाला त्रासदाय़क ठरू शकते. अर्ध शिजलेली अंडी खाल्ल्याने पोटाच्या समस्या, उलटी होणे, शरिराला सूज येणे किंवा अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

हद्यरोगाचा त्रास असणाऱ्या व्यक्तिंनीही अंड्यातील बलक खाणं टाळावं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी वाढून शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला हाय ब्लड-प्रेशर किंवा डायबीटीसचा त्रास असेल तर अंड्यातील सफेद भाग खावा. अंड्यातीस पिवळा भाग खाणे हानिकारक ठरू शकते.

- Advertisement -

एका संशोधनानुसार अंड्याचे अधिक सेवन केल्याने प्रोटेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी खाताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -