घरलाईफस्टाईलजाणून घ्या लिंबाचे घरगुती फायदे

जाणून घ्या लिंबाचे घरगुती फायदे

Subscribe

लिंबू हे फळ बाराही महिने बाजारात आढळून येते. या फळाचे उत्तम असे लाभदायी फायदे आहेत. लिंबाचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. नेमके लिंबाचे कोणते लाभदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया.

हे आहेत लिंबाचे घरगुती उपाय

  • हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस एक रामबाण उपाय आहे. रक्त येणाऱ्या हिरड्यांवर लिंबाचा रस चोळल्यास रक्त येणं थांबते.
  • वेळीअवेळी जेवल्यामुळे अफचनाचा त्रास होतो. अशावेळी थंड पाण्यात लिंबू पिळून ते प्यायल्याने अपचनाचा त्राक कमी होतो.
  • गॅसचा त्रास होत असल्यास दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास गॅसचा त्रास दूर होण्यास मदत होते.
  • आंघोळीच्या पाण्यात एका लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.
  • चेहरा काळवंडला असल्यास दोन चमचे बेसन, साय, लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद एकत्र करुन ती पेस्ट चेहऱ्या लावल्याने काळवंडलेपणा कमी होऊन रंग उजळतो.
  • नख बळकट आणि तजेलदार होण्यास नखांवर लिंबाची साल घासावी. लिंबामुळे नख लवकर वाढतात आणि पांढरी शुभ्र होण्यास मदत होते.
  • घरात येणाऱ्या मुंग्यांना घालण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी लिंबाचा रस पिळावा. यामुळे मुंग्या येत नाहीत. स्वयंपाकातील भांड्यांना उग्रवास येत असल्यास त्या भांड्यात लिंबू पिळावे.
  • एखाद्या वेळी हाताला किंवा भांड्याला मसाल्याचा वास येत असल्यास त्यावर लिंबू चोळावे. असे केल्यास वास कमी होतो.
  • कपड्यांना डाग लागले असल्यास त्यावर लिंबाची साल चोळावी यामुळे डाग जाण्यास मदत होते.
  • केस तेलकट असल्यास लिंबू लावावे यामुळे केसांचा तेलकटपणा कमी होतो आणि केसांना एक वेगळी चमक येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -