घरलाईफस्टाईलमानसिक तणाव कमी करण्यासाठी ऐका संगीत

मानसिक तणाव कमी करण्यासाठी ऐका संगीत

Subscribe

चॉकलेट-कॉफीचे सेवन करणे, संगीत ऐकणे आणि ध्यानधारणा करणे यासारख्या सवयी अनेक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता कमी करतात. मॅकगिल विद्यापीठाच्या न्यूरोसायंटिस्टच्या मते, संगीत ऐकल्याने डोपामाइन हार्मोन सक्रिय होतो. हा हार्मोन तणाव घालवणे आणि मूड चांगला करण्यासाठी खूप गरजेचा आहे. संशोधनादरम्यान संगीत ऐकणार्‍यांचा ब्रेन स्कॅन करण्यात आला होता. त्यामध्ये संगीत ऐकल्यानंतर न्यूरोकेमिकल्सची सक्रियता वाढत असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले.

नियमितपणे ध्यानधारणा करणे ही तणाव घालवण्याची चांगली पद्धत आहे. यामुळे मूडही चांगला राहतो. तज्ज्ञांच्या मते, ध्यानधारणा केल्याने वायफळ चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. ही पद्धत एखाद्या अँटिडिप्रेसेंटच्या रूपात काम करते. तसेच यामुळे एकाग्रताही वाढते आणि तणाव घालवण्यासाठी आवश्यक असलेली मन:शांतीही मिळते. कोणत्याही मुलाच्या लहानपणावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. सुमारे एक हजार मुलांवर एक संशोधन करण्यात आले. यामध्ये मुले युवावस्थेत येईपर्यंत त्यांचे अवलोकन करणे कायम ठेवण्यात आले होते. मुलांच्या पालन-पोषणाचा परिणाम युवावस्थेतही जाणवतो, असे त्यात आढळून आले. ज्या मुलांचे पालन-पोषण चांगल्या प्रकारे होते ती मुले तरुणावस्थेत अधिक निरोगी, आनंदी आणि स्व-नियंत्रित होतात. तसेच ज्या मुलांना टास्क पूर्ण करण्यास त्रास होतो किंवा चिडचिड करतात अशा मुलांचे वजन वाढते. तसेच त्यांचे औषधांवर अवलंबून राहण्याचे प्रमाणही वाढते, असेही संशोधनात आढळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -