घरलाईफस्टाईलवजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

Subscribe

लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जाताना दिसत आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढवण्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु, जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र हे वजन काही नैसर्गिक पदार्थांच्या सेवनाने कमी करता येते तसेच नियंत्रणात ठेवता येते. ते पदार्थ कोणते आहेत? ते आपण पाहणार आहोत.

दही
दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.

मध 
मध लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने याचा चांगला फायदा होतो.

- Advertisement -

आवळा
आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करुन घेणे. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास कंबर बारीक होण्यास मदत होते.

गाजर
गाजराचे भरपूर सेवन करावे. गाजर खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते, असे आधुनिक विज्ञानातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे जेवणासोबत नियमित गाजर सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

- Advertisement -

पपई
पपई या फळाचे नियमित सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. याकरता पपईचे दररोज सेवन केल्यास कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -