घरलाईफस्टाईलनाश्ता रेसिपी - मॅक्रॉनी उपमा

नाश्ता रेसिपी – मॅक्रॉनी उपमा

Subscribe

मॅक्रॉनी उपमा रेसिपी

नाश्ताला किंवा लहान मुलांच्या डब्याला झटपट काही बनवायचे असेल तर मॅक्रॉनी उपमा नक्की ट्राय करु शकता.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी मॅक्रॉनी
  • १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • १ वाटी बारीक चिरून टोमॅटो
  • १ ते २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा तूप
  • १/४ चमचा जिरे
  • २ चिमटी हिंग
  • ४-५ कढीपत्ता पाने
  • चवीपुरते मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळानुसार उकळवून मॅक्रॉनी शिजवाव्यात. चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणी निथळू द्यावे. नंतर कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतून टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला मऊसर होईस्तोवर परतावा. आता मॅक्रॉनी घालून मिक्स करावे. चवीपुरते मीठ घालावे. २ मिनिटे गरम करून कोथिंबिरीने सजवून लगेच सर्व्ह करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -