घरलाईफस्टाईल'भोगी'ची स्पेशल भाजी

‘भोगी’ची स्पेशल भाजी

Subscribe

भोगीची रेसिपी.

‘भोगी’निमित्त स्पेशल भोगीची रेसिपी.

साहित्य

- Advertisement -

३ वांगी
अर्धी वाटी वर्णे
अर्धी वाटी मटार
अर्धी वाटी हिरवे हरभरे
अर्धी वाटी भिजवलेले कच्चे शेंगदाणे
अर्धी वाटी ओलं खोबरं
पाव वाटी कोथिंबीर
पाव वाटी तेल
चिरलेली गाजरे – दोन
चिरलेला कांदा एक
एक टेबल स्पून तीळ
तिखट दोन चमचे
चवीनुसार मीठ
हळद
हिंग
दोन चमचे गूळ
एक चमचा गरम मसाला पावडर

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम वांगी, गाजर चिरून घ्या. त्यानंतर सर्व भाज्या एकत्र करा. भांड्यात तेल तापवा, त्यात कांदा परतून घेऊन त्यात हिंग, हळद घालून पुन्हा एकदा परतवा. त्यानंतर त्यामध्ये भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरे घालून छान एकजीव करा आणि त्यानंतर त्यात गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला. अशा रितीने तुमची ‘भोगी’ स्पेशल भाजी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -